Atlee On New Bollywood Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Atlee On Bollywood Movie: ॲटली कुमार ‘जवान’नंतर बॉलिवूडच्या २ सुपरस्टारसोबत करणार नवा चित्रपट, दिग्दर्शकानेच सांगितलं सर्व काही...

Atlee New Bollywood Movie: जवानच्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक ॲटली कुमार बॉलिवूडच्या २ सुपरस्टारसोबत आगामी चित्रपट बनवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Atlee On New Bollywood Movie

ॲटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशातही चित्रपटाची कमाल चर्चा सुरू आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ७३५.०२ कोटींचा जगभरामध्ये आकडा गाठला आहे. तर लवकरच भारतातही ॲटली कुमारचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा पल्ला गाठणार आहे. जवानच्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक ॲटली कुमार सलमान खान आणि हृतिक रोशनला घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.

ॲटली कुमारने आतापर्यंत अनेक साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं आहे. नुकतंच पिंकव्हिलासोबत बोलताना दिग्दर्शक ॲटली कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे. ॲटली आता ‘जवान’नंतर बॉलिवूडमध्ये आणखीन एक नवीन चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले आहे. नवीन चित्रपटासाठी ॲटली बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींसोबत बोलत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. (Bollywood Actor)

नवीन चित्रपटाबद्दल पिंकव्हिलासोबत बोलताना दिग्दर्शकाने माहिती दिली की, “मी वेळोवेळी अनेक सिनेप्रेमींसोबत चित्रपटाच्या कथेसह अनेक गोष्टींवर चर्चा करत असतो. मी आतापर्यंत सलमान खान, हृतिक रोशन, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विजय थलपथी आणि अल्लू अर्जुन सोबत चित्रपटाविषयी बोललो आहे. आम्ही सिनेप्रेमी असल्यामुळे एकाच गोष्टीला चिकटून राहत नाहीत.” (Bollywood Film)

ॲटली कुमार चित्रपटाविषयी पुढे म्हणाला, “ होय, आम्ही लवकरच सर्व कलाकार एकत्र येण्याच्या विचारात आहेत. आम्ही एकत्र एका चित्रपटामध्ये काम करणार आहोत. एकदा का देवाचा आशीर्वाद मिळाला की, चित्रपटाच्या पुढच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला फार आवडेल. सोबतच आमच्या सर्वांमध्ये ताळमेळ आहे, आपल्याला फक्त देवाचे आशीर्वाद आणि चांगली कथा स्क्रिप्ट हवी आहे, हे सर्व उपलब्ध झाले की, चित्रपटाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. ” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खा. निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे...

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

Jeans: जीन्स घालाल तर जेलमध्ये जाल? 'या' ठिकाणी जीन्स घालण्यावर बंदी

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ, भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा

Palghar Tourism : ना मरीन ड्राईव्ह, ना जुहू चौपाटी; वीकेंडला करा 'या' समुद्रकिनाऱ्याची सफर

SCROLL FOR NEXT