Actors Wife Money Fraud Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Actors Wife Money Fraud: अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल १६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तडक कारवाई करत मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

Shruti Vilas Kadam

Actors Wife Money Fraud: बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या कुटुंबाशी संबंधित एक मोठे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल १६ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी निशित पटेल याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हबीबा जाफरी यांनी बांद्रा पश्चिम येथील एका पुनर्विकास प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली होती. आरोपींनी या प्रकल्पातून मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र गुंतवणुकीनंतर ना प्रकल्प पूर्ण झाला, ना गुंतवलेले पैसे परत मिळाले. हा प्रकार लक्षात येता हबीबा यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने तपास सुरू केला असून ब्रिटिश वंशाचा व्यावसायिक निशित पटेल यासह महेश पाटील, रूपेश, सागर मेहता, देवेंद्र पडवळ आणि इतरांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी एकूण सहा जणांविरोधात BNS च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३४१(१), ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि गुंतवणुकीशी संबंधित पुरावे तपासले जात आहेत.

तपासादरम्यान आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि खोटी आश्वासने वापरून अनेक गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही निवृत्त अधिकारी, कलाकार आणि व्यावसायिकांनीही या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची आणि संबंधित व्यक्तींची पूर्ण पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT