Javed Akhtar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar Birthday: नावजलेल्या घराण्यातून आलेल्या जावेद यांचा सिनेसृष्टीतील प्रवास...

जावेद अख्तर यांचे वडील प्रसिद्ध कवी असूनही त्यांना इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.

Chetan Bodke

Javed Akhtar Birthday: प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी आज ७८ वर्षात पदार्पण केले. जावेद अख्तर यांचे नाव चित्रपट, कला आणि साहित्य विश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. संघर्षाच्या खडतर टप्प्यातून मार्ग काढत यांनी आपले नाव कमावले. जावेद अख्तर यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला होता. जावेद अख्तर यांचे वडील प्रसिद्ध कवी असूनही त्यांना इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया...

जावेद अख्तर यांचे व्यक्तिमत्व भारतीय सिनेसृष्टीत खूप मोठे आहे. 'कल हो ना हो', 'वेक अप सिड', 'वीर-जारा' आणि 'लगान' यांसारख्या चित्रपटासाठी जावेद यांनी गाणी लिहीले आहे. जावेद यांच्या कुटुंबाचा एक इतिहास देखील बराच चर्चेत आहे. जानीसार अख्तर आणि प्रसिद्ध लेखिका साफिया अख्तर हे जावेद यांचे आई- वडील आहे.

जावेद अख्तर यांनी आपल्या घराण्याची लेखन परंपरा कायम जपली होती. काही राज्यांमध्ये प्रवास केल्यानंतर जावेद मुंबईत येऊन सिनेसृष्टीत आपली स्वत:ची ओळख तयार केली. एवढ्या मोठ्या आणि प्रसिद्ध घराण्यातील असूनही त्यांची सिनेसृष्टीतील वाटचाल अवघड होती. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद अख्तर यांना मुंबईत येताच काही काळ घरासाठी संघर्ष करावा लागला.

जावेद अख्तर यांचे खरे नाव जादू होते. त्यांचे वडील जन्नीसार अख्तर यांच्या 'लम्हा किसी जादू का फसाना होगा' या कवितेवरून त्यांचे नाव ठेवण्यात आले होते. जावेद यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर सलीम खानसोबतची त्यांची जोडी खूप चांगली होती.

सलीम-जावेद जोडीने जवळपास 24 चित्रपटांसाठी संवाद लिहिले आहेत. पण, काही वैचारिक मतभेदांनंतर ही जोडी वेगळी झाली. यानंतर जावेद यांनी गीतकार म्हणून सिनेसृष्टीत आपली कारकीर्द सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT