Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: जान्हवीने अरबाजला कॅप्टनसी टास्कमधून बाहेर काढलं, आता वैभवचं काय होणार?

Vaibhav Chavan : या आठवड्यात बिग बॉस घरात धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. कॅप्टन्सी टास्कच्या राड्यानंतर आता वैभवचा नवा गेम प्लान काय असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात नुकताच पार पडलेला कॅप्टनसी टास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली तर दुसरीकडे कॅप्टन न होता आल्याने निक्की हतबल झाली आहे. या संदर्भातील चर्चा बिग बॉस घरात पाहायला मिळत आहे. जान्हवी म्हणतेय, "मला ट्रॉफी मिळो किंवा नको मिळो मला निक्कीचा गर्व उतरवायचा आहे". त्यावर पॅडी दादा म्हणतात, "तिचा गर्व उतरलाय, हतबल झाली आहे ती." यावर अंकिता म्हणतेय, "आम्ही तिला सांगत होतो फुटेज देऊ नको आम्हाला तू बाहेर जा".

'बिग बॉस 'च्या घरात टीम ए विरूद्ध टीम बी पाहायला मिळत आहे. आधी पासूनच घरात टीम बी चं वर्चस्व पाहायला मिळत आहे. पण आता मात्र खेळाला नवा रंग येणार आहे. करण टीम ए मधील निक्की बिग बॉसच्या शिक्षेमुळे कधीच कॅप्टन होऊ शकणार नाही. तर जान्हवीने दुसऱ्या फेरीत कॅप्टन्सी टास्कमध्ये बजर वाजवून अरबाजला नॉमिनेट केले. आता फक्त टीम ए मधील वैभव (Vaibhav Chavan) राहिलाआहे. आता त्याला तरी कॅप्टन्सी मिळेल का? की सर्व बाजी टीम बी मारणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. जान्हवी एकटी गेम खेळणार आहे. त्यामुळे तिची पुढची खेळी काय असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात जान्हवी आणि अभिजीत अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी म्हणतेय,"अरबाजला मला काहीतरी मोठं काम द्यायचं होतं. माझी टीम जर तयार असेल तर मी करेल असं मी त्याला म्हणाले होते". अभिजीत म्हणतो, "मागच्या आठवड्यात तिकडे सुरू होतं ते आता तुझ्यासोबत सुरू आहे". जान्हवी म्हणते, "करू देत, माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत. कॅप्टनसी पदाच्या उमेदवारीतून मला काढण्यात आलंय. मी त्याला का आता सेफ करावं".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

SCROLL FOR NEXT