Janhvi Kapoor And Shikhar Pahariya at Tirupati Balaji Temple Instagram @janhvikapoor @shikharpahariya
मनोरंजन बातम्या

Janhvi At Tirupati Temple: जान्हवीने बॉयफ्रेंडसह घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल

Janhvi Kapoor visits Tirupati temple: सोशल मीडियावर जान्हवी कपूरची तिरुपती बालाजी येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Janhvi Kapoor visits Tirupati temple with Shikhar Pahariya: जान्हवी कपूर सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. तसेच ती सध्या तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियामुळे देखील चर्चेचा विषय बनते. आज शिखरच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात गेली आहे. सोशल मीडियावर जान्हवी कपूरची तिरुपती बालाजी येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूरने नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती शिखर पहाडियाला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती शिखरसोबत दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीची बहीण खुशी कपूरनेही शिखर पहाडियाला शुभेच्छा देणारा एक फोटो शेअर केला आहे.

जान्हवीसोबत तिची धाकटी बहीण खुशी कपूर देखील तिरुपतीला मंदिराला भेट दिली आहे. व्हिडिओमध्ये मंदिरासमोर डोके टेकवताना आणि हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. या तिघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये जान्हवी आणि खुशी पारंपारिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर शिखरनेही धोतर घातले आहे. चाहतेही या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि सतत कमेंट देखील करत आहेत.

जान्हवी आणि शिखर अनेकदा एकत्र दिसले आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेन्टरच्या कार्यक्रमाच्या वेळी शिखर जान्हवीच्या कुटुंबासोबत दिसला होता. जान्हवी कपूर बॉलिवूडनंतर साऊथ सिनेमात पदार्पण करणार असल्याची माहिती आहे. त्याने नुकतेच 'NTR30'चे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात ती ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT