Janhvi Kapoor And Shikhar Pahariya at Tirupati Balaji Temple Instagram/ @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor And Shikhar Pahariya : जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया लग्न करणार? स्वत: जान्हवीनेच केला नात्याबाबत खुलासा

Janhvi Kapoor And Shikhar Pahariya Wedding : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पाहारिया या दोघांच्या नात्याबाबत अनेकांनी खुलासा केलाय. अशातच आता स्वत: जान्हवीनेच त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.

Mohini Sonar

सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चांगलीच चर्चेत आली आली आहे. ती म्हणजे तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे जान्हवी कपूर आणि शिखर पाहारिया या दोघांच्या नात्याबाबत अनेकांनी खुलासा केलाय. आधीपासून जान्हवी कपूर तिची पर्सनल लाईफ लपवून ठेवायची. आता मात्र तिनं तिचं पर्सनल आयुष्य हळू हळू उघड करायला सुरुवात केली आहे. शिखर पहारिया आणि तिच्या नात्याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासाही केला होता. अंबानींच्या लग्नात शिखर आणि जान्हवी एकत्र दिसून आले. त्यावेळचे त्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती. ज्यात काहीतरी सरप्राईज असल्याचं तिनं सांगितलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तिनं याबाबत खुलासा केला, की हे सरप्राईज तिच्या आगामी चित्रपटाविषयी आहे. त्याचवेळी एकानं तिला लग्नाविषयी सवाल विचारला, तेव्हा तिनं तुम्ही वेडे झाल्याचं म्हटलं. मात्र तिनं सोशल मिडियावर बोलताना शिखरबाबत काहीही विधान केलं नाही.

मात्र काही दिवसांपुर्वी एका टीव्ही शो च्या मुलाखतीत तिला शिखरसोबत लग्न करण्याबाबत आणि त्या दोघांच्या नात्याबाबत विचारलं असता तिनं खुलासा केला होता. ती म्हणाली, "शिखर आणि आतापासून नाही, तर गेल्या 15, 16 वर्षांपासून सोबत आहोत. तो आणि मी खूप क्लोज आहोत. आणि मला वाटतं की, माझी स्वप्न ही त्याची स्वप्न आहेत आणि त्याची स्वप्न माझी स्वप्न आहे." मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला होता.

दरम्यान, काही दिवसांआधीही जान्हवी कपूरच्या लग्नाबाबतच्या अफवा समोर आल्या होत्या. त्यात ती तरुपती बालाजी इथे जाऊन लग्न करणार असल्याचं कळलं होतं. पण यानंतर ही केवळ अफवा असल्याचं समजलं. असं असलं तरी शिखर आणि जान्हवीचे सोबत असतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

तिच्या शुटिंगच्या ठिकाणीही शिखर नेहमी जात असतो अशी चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोघी लग्न करु शकतात. आशी चर्चा आहे. शिवाय या दोघांमध्ये असलेलं नातं स्वतः जान्हवीनेही कबूल केलं आहे. एवढंच नागही तिनं शिखरच्या नावाचं पेंडंटही गळ्यात घातल्याचं दिसलं. विशेष म्हणजे जान्हवी आणि शिखर त्यांच्या नात्यात अतिशय सिरियस असल्याचंही दिसून येतं.

सध्या जान्हवी कपूरचे दोन सिनेमे येणार आहेत. उलझ आणि देवरा. या दोन्ही सिनेमांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. उलझ हा एक थ्रिलरपट आहे. तर देवरा हा तमिळ चित्रपट असून त्यात जान्हवीसोबत सैफ अली खान आणि ज्युनिअर एनटीआर दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT