Homebound Movie in Cannes 2025 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Cannes 2025: जान्हवी-इशानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा, 'होमबाउंड' ची थेट कान्समध्ये एन्ट्री

Homebound Movie: जान्हवी कपूर आणि इशान खट्टर प्रमुख भूमिका असलेला 'होमबाउंड' या चित्रपटाची प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या 'Un Certain Regard' विभागासाठी निवड करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Cannes 2025: दिग्दर्शक नीरज घेवान यांच्या 'होमबाउंड' या चित्रपटाची निवड प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या 'Un Certain Regard' विभागात झाली आहे. या विभागात जगभरातील कलात्मक आणि नाविन्यपूर्ण चित्रपट सादर केले जातात. 'होमबाउंड' मध्ये जान्हवी कपूर आणि इशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत, आणि या निवडीमुळे भारतीय सिनेमाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेत भर पडली आहे.

चित्रपटाच्या निवडीची घोषणा गुरुवारी करण्यात आली, ज्यात वेस अँडरसन आणि अरी आस्टर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांच्या चित्रपटांचाही समावेश आहे. इशान खट्टरने त्याच्या इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर करत 'होमबाउंड' हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपट असल्याचे सांगितले. त्याने दिग्दर्शक नीरज घेवान यांचे कौतुक करत, हा चित्रपट त्याच्या चित्रपट प्रवासातील एक अभिमानास्पद क्षण असल्याचे नमूद केले.

जान्हवी कपूरनेही सोशल मीडियावर आपली उत्सुकता व्यक्त करत, 'होमबाउंड' च्या कान्स निवडीमुळे भारतीय सिनेमा जागतिक पातळीवर पोहोचत असल्याचे सांगितले. तिने चित्रपटाच्या टीमचे आभार मानत, प्रेक्षकांसमोर हा प्रवास मोठ्या पडद्यावर सादर करण्याची उत्सुकता व्यक्त केली.

'होमबाउंड' हा चित्रपट नीरज घेवान यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात जान्हवी कपूर, इशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर मारीके डी सूझा आणि मेलिटा टॉस्कन डू प्लांटियर सह-निर्माते आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 चे आयोजन 13 मे ते 24 मे दरम्यान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT