Janhvi Kapoor Instagram @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या स्वप्नांनी उडवली झोप, शूटिंग दरम्यानचा सिरीयस किस्सा केला शेअर

'मला आठवते की या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता', जान्हवी कपूर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Janhvi Kapoor Latest News: जान्हवी कपूर तिच्या चित्रपटातील भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवीने चित्रपटाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या आगामी चित्रपटातही एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. जान्हवीने या भूमिकेसही प्रचंड मेहनत घेतल्याचे सांगितले आहे.

गुंजन सक्सेना मधील पायलट असो किंवा गुड लक जेरी मधील एका सर्वसामान्य घरातील मुलगी, जान्हवीने तिच्या प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जान्हवीच्या मेहनतीचे आणि चांगल्या कथांमुळे जान्हवीला एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख मिळू लागली आहे. जान्हवी तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी भरपूर मेहनत करते म्हणूनच तिला मिली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मानसिक तणाव सहन करावा लागला. तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग करत असताना मला झोपेत भयंकर स्वप्ने पडायची. माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता. (Actress)

जान्हवी म्हणाली, 'मला आठवते की या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. शूट संपवून घरी यायचे आणि झोपायला जायचे तेव्हा मला वाईट स्वप्ने पडत होती. मला वाटायचे की मी अजूनही फ्रीजरमध्ये बंद आहे. मी आजारीही पडले होतो. मी दोन ते तीन दिवस पेन किलर खाऊन काम केले आहे. मीच नाही तर दिग्दर्शकही आजारी पडले होते.'

'तुम्ही दिवसातील १५ तास फ्रीजरमध्ये घालवले तर तुम्हाला तिथली परिस्थिती कळेल. कधी-कधी उंदीरही येतात आणि बोट कुडतडु लागतात. ही भावना कधीही ग्लॅमरस असू शकत नाही. ही भूमिका साकारण्यासाठी मला किती मानसिक यातना सहन कराव्या लागल्या हे फक्त मलाच माहीत आहे. (Movie)

जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मल्याळम चित्रपट हेलनचा हा रिमेक आहे. या चित्रपटासाठी टीमने 20 दिवसांत एक फ्रीझर बनवला, ज्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस होते. या चित्रपटात जान्हवीने मिली नौदियालची या नर्सची भूमिका साकारत आहे. तिला कॅनडाला जाऊन तिचं करिअर करायचे आहे. या चित्रपटासाठी जान्हवीला 7.5 किलो वजन वाढवले होते. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: नागपुरमध्ये खासदाराच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू; वाहनाचा चक्काचूर

Sonalee Kulkarni: 'परमसुंदरी' अप्सरा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक, पाहून मन होईल घायाळ

Maharashtra Live News Update: Parbhani: बस आणि पिकअपचा भीषण अपघात, बस झाली पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT