Winner Sankalp Kale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mi Honar Superstar Chhote Ustad 2: 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' मध्ये संकल्प काळेची बाजी, ट्रॉफिवर नाव कोरत मिळवले इतके लाख

Winner Sankalp Kale: संकल्पने पहिला क्रमांक पटकावत या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

Priya More

Mi Honar Superstar Chhote Ustad 2 Winner Sankalp Kale:

स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध रियालिटी शो 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2'चा (Mi Honar Superstar Chhote Ustad) महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. जालन्याचा संकल्प काळेने (Sankalp Kale) 'मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद 2' या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरलं आहे. या शोचा विजेता ठरलेल्या संकल्पला ट्रॉफी आणि धनादेश देण्यात आला आहे. सध्या चिमुकल्या संकल्पवर सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद 2' या शोचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. या महाअंतिम सोहळ्यात संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारली आणि विजेतेपदावर मोहोर उमटवली. संकल्पने पहिला क्रमांक पटकावत या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. विजेता ठरलेल्या संकल्प काळेला ४ लाखांची रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली.

अकोल्याची श्रुती भांडे 'मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद 2' या शोची उपविजेती ठरली . नाशिकच्या सृष्टी पगारेने तृतीय क्रमांक पटकावला. तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी गौरवण्यात देखील आलं. यावर्षीचा ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ हा शो खूपच सुपरहिट ठरला. यावेळी या शोला खूपच चांगले स्पर्धक मिळाले होते. जरी या शोमध्ये संकल्पने बाजी मारली असली तरी देखील इतर सर्व स्पर्धकांनी जबरदस्त कामगिरी केली.

या शोचा विजेता ठरलेल्या संकल्प काळेने सांगितले की, ‘मी आजवर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मात्र छोटे उस्तादच्या मंचाने मला संधी दिली आणि मला माझं गायन कौशल्य सादर करता आलं. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT