G Marimuthu Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

G Marimuthu Passes Away: ‘जेलर’ फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, वयाच्या ५८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Chetan Bodke

G Marimuthu Passes Away

तामिळ सिनेसृष्टीतून दु:खद बातमी येत आहे, प्रसिद्ध तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांची वयाच्या ५८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. जी मारीमुथू नुकतेच रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जी मारीमुथू यांची ८ सप्टेंबरला सकाळी ८:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. जी मारीमुथू सन टीव्ही सोप, एथिर नीचल या टेलिव्हिजन शो करिता डबिंग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लगेचच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केले.

अभिनेत्याच्या निधनामुळे तामिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जी मारीमुथू हे टेलिव्हिजनसृष्टी प्रमाणे चित्रपटसृष्टीतले ही प्रसिद्ध पटकथा आणि संवाद लेखक आहेत. मरीमुथू यांनी १९९९ मध्ये अजितच्या ‘वाली’ चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिका साकारली होती. हा चित्रपट तिच्या फिल्मी करियरमधला पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर जी मारीमुथू यांनी ‘असाई’ या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. त्या चित्रपटामध्ये अजित, सुवललक्ष्मी आणि प्रकाश राज हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. सोबतच जी मारीमुथू यांनी कमल हसनच्या ‘इंडियन २’चे ही शूटिंग पूर्ण केले होते.

२००८ मध्ये ‘कन्नम कन्नम’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यु केलं होतं. सोबतच त्यांनी त्या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले असून चित्रपटामध्ये त्यांनी एक लहान पात्र ही साकारले होते. सोबतच त्यांनी अनेक तामिळ चित्रपटात सहाय्यक भूमिकाही साकारली होती. युद्धम सेई (२०११), कोडी (२०१६), बैरवा (२०१७), काडैकुट्टी सिंगम (२०१८), शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम (२०२१), आणि अतरंगी रे (२०२१) या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, 'या' राशींच्या व्यक्तींसाठी सोमवार भाग्याचा; कोणाला होणार मोठे लाभ? वाचा...

Horoscope Today : सोमवारचे राशीभविष्य, आज कोणाच्या नशिबात काय? वाचा...

Haryana Assembly Election: हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी

Kolhapur News: लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?

CNG Price Hike: ऐन गणेशोत्सवात नागरिकांना फटका; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये CNG च्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर

SCROLL FOR NEXT