King Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

King Movie : 'पाताल लोक'चा हिरो शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये झळकणार, कोणती भूमिका साकारणार?

Jaideep Ahlawat : शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात 'पाताल लोक' फेम अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा अभिनेता नक्की कोण आणि कोणत्या भूमिकेत झळकणार, सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंग'मुळे (King Movie) चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. नुकतीच'किंग' चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या सुपरस्टारची वर्णी लागली आहे. शाहरुख खानसोबत 'किंग' चित्रपटात वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) झळकणार आहे.

जयदीप अहलावतने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, "किंग चित्रपटात माझी छोटी भूमिका आहे. " शाहरुख खानचे कौतुक करत पुढे जयदीप अहलावत म्हणाला, शाहरुख खान मला खूप आवडतात. "रईस चित्रपटात मी 4-5 दिवस त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप वेगळे आहे. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ते माझ्याशी कायम खूप छान वागायचे आणि बोलायचे."

'किंग' चित्रपट

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार धुमाकूळ घालणार आहेत. 'किंग' हा सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग' चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जयदीप अहलाव वर्कफ्रंट

जयदीप अहलाव याने आजवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 'पाताल लोक' ही जयदीप अहलावची गाजलेली वेब सीरिज आहे. अलिकडेच जयदीप अहलाव 'ज्वेल थीफ' या चित्रपटात झळकला आहे. यात त्याने सैफ अली खानसोबत काम केले आहे. जयदीप अहलावचे चाहते आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा; तुम्हाला मिळाले का?

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

Saturday Horoscope: जवळच्या व्यक्तीकडून होणार फायदा, ५ राशींना पैशाची तंगी; वाचा शनिवारचे राशी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

SCROLL FOR NEXT