Aai Tuljabhavani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aai Tuljabhavani : 'आई तुळजाभवानी' मालिकेत म्हाळसाची एन्ट्री; 'जय मल्हार' फेम अभिनेत्री साकारणार भूमिका

Surabhi Hande : 'जय मल्हार' फेम अभिनेत्री सुरभी हांडेची 'आई तुळजाभवानी' या मालिकेत एन्ट्री झाली आहे. सुरभी कोणती भूमिका साकारणार जाणून घ्या.

Shreya Maskar

महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची या मालिकेत एन्ट्री होणार आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरभी (Surabhi Hande) म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वा.'कलर्स मराठी'वर पाहता येईल. या भागामध्ये म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनानांचा संहार कसा करतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता 'आई तुळजाभवानी' या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे. चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 'आई तुळजाभवानी' मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल.

सुरभी हांडे म्हणाली,"10 वर्षाने म्हाळसा आता परत सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता 'आई तुळजाभवानी' या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे."

पुढे सुरभी म्हणाली की,'आई तुळजाभवानी' सह म्हाळसा जेव्हा असूरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटलं..तिचंही कौतुक वाटलं. 'आई तुळजाभवानी' मालिकेत म्हाळसा हे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल 'कलर्स मराठी' आणि बहुरुपी प्रोडक्शनचे आभार".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT