मनोरंजन बातम्या

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत अनुभवा स्वामीच्या पादुकांचा अद्भुत दैवी प्रवास!

Jai Jai Swami Samarth Serial Update: जय जय स्वामी समर्थ मालिकेत अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे.

Manasvi Choudhary

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे. स्वामी चरणपादुकांचा दैवी अध्याय सध्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सुरु आहे आणि आता याच शृंखलेत आता अजून एक अध्याय जोडला जाणार आहे. येत्या आठवड्यात बघायला मिळणार आहे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. या अध्यायातला महत्वाचा टप्पा या आठवड्यात सादर होतो आहे, स्वामी चरणपादुका जश्या पिढ्यांपिढ्या पूजल्या जातात, तश्याच ज्या घरात त्यांची पूजा थांबते तेव्हा त्या योग्य व्यक्तीच्या हाती जातात.

स्वामींच्या पादुकांचा हा दैवी प्रवास विलक्षण रंजक असून त्यापाठची उत्कंठावर्धक कथा सोपान आणि अवंती या दोन वेगळ्या गावात राहणाऱ्या स्वामी भक्तांच्या लोकविलक्षण गोष्टीतून उलगडत जाते. प्रत्येक स्वामी भक्तांने आवर्जून पहावी अशी ही गोष्ट चरणपादुकांच्या अध्यायातल्या अज्ञात अश्या पैलूवर प्रकाश टाकते. तेव्हा नक्की पहा स्वामी पादुकांचा दैवी प्रवास 27 जानेवारी रोजी ‘जय जय स्वामी समर्थ’ रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर.

"अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही, आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही," स्वामींच्या या शब्दांना प्रत्येक भागात उजाळा मिळत आहे. या अध्यायाची सुरुवात झाली आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींच्या गोष्टीनी. यांनतर आरंभ झाला नव्या परंपरेचा ज्यात उलघडला स्वामी मुखवट्याचा महिमा. स्वामींच्या मुखवटा - पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने नवजात बाळावर पडणारी पिशाच्च सावली दूर होते आणि देवकीला पुत्रसुख प्राप्त होते. आता या स्वामी पादुकांनी सोपान आणि अवंती या भक्तांचा कसा उद्धार होणार ? पुढे मालिकेला कुठले रंजक वळण येणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा ‘जय जय स्वामी समर्थ’ रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर.

या महिनाभरात प्रेक्षकांना स्वामींच्या पादुकांमुळे होणारे चमत्कार, आणि भक्तांच्या जीवनाला मिळणारे दैवी अनुभव पाहायला मिळतील. तेव्हा नक्की पहा अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय, जय जय स्वामी समर्थ मालिकेत दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

Woman Saree Look: साडी नेसलेल्या मुली मुलांना का आवडतात?

SCROLL FOR NEXT