Jacqueline Fernandez News Saam Tv
मनोरंजन बातम्या

जॅकलिन- सुकेश चंद्रशेखरमधील नात्याबाबत मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच प्रकरणामुळं प्रकाशझोतात आली आहे. सुकेश चंद्रशेखर सोबतच्या मनी लॅंड्रिंग प्रकरणात जॅकलिनची ईडी चौकशी सुरू आहे. अशातच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नुकतीच, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेशसोबत लग्न करायचे होते. जॅकलिनने याबाबत अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानला सुद्धा सांगितले होते. यानंतर या दोन्ही कलाकारांनी तिला सुकेशसोबत अलर्ट केले होते. तपास पथकातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा खुलासा केला आहे, पुढे त्याने सांगितले की, याबाबत जॅकलिनला सुकेशसोबत तिच्या सहकलाकारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला होता. मात्र तरीही जॅकलिन सुकेशला भेटत राहिली. याशिवाय ती त्याच्याकडून अनेक महागडे गिफ्ट्स घेत राहिली.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र यादव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि त्याच्यासोबत रिलेशन आणि व्यवहार सुरू ठेवला. ईडीच्या तपासानुसार, केवळ जॅकलिनलाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही याचा आर्थिक फायदा झाला आहे.

ईडीने जॅकलिन फर्नांडिसचा व्यवस्थापक प्रशांतकडून सुपरबाइक जप्त केली आहे. जिची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे. सुकेशने ही बाइक प्रशांतला भेट म्हणून दिली आहे. सुकेश जॅकलिनला महागड्या वस्तू भेट देऊन इम्प्रेस करत होता. तो प्रचंड श्रीमंत असल्याचे जॅकलिनला भासवत होता. पण त्याने ही सगळी संपत्ती खंडणीद्वारे मिळवली होती. सुकेशने केवळ जॅकलिनलाच नाही तर अनेक अभिनेत्रींना त्याच्या जाळ्यात अडकवले आहे. याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडच्या आणखी पाच अभिनेत्रींची नावे समोर येऊ शकतात. अलीकडेच अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव समोर आले आहे आणि तिची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; २० गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Live News Update: वणीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक; मोदी, शहांविरोधात घोषणाबाजी

Parbhani Rain: परभणीत मुसळधार पावसाचा तडाखा; जिंतूर तालुक्यात घरे व मंदिरे पाण्यात|VIDEO

Kidney Cancer: किडनी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' बदल

Shocking: वर्गमित्रांचं भयंकर कृत्य! झोपलेल्या मित्रांच्या डोळ्यात टाकलं फेव्हिकॉल, ८ मुलांचे डोळे चिकटले

SCROLL FOR NEXT