Jacqueline Fernandez SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez : जॅकलिन पोहचली सिद्धिविनायक मंदिरात; एलॉन मस्कच्या आईसह घेतलं गणपतीचं दर्शन, पाहा PHOTOS

Jacqueline Fernandez -Maye Musk Visit Siddhivinayak Temple : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यावेळी तिच्या सोबत एलॉन मस्क यांच्या आई देखील होत्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो दिवाने आहेत. तिने चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता नुकतेच जॅकलिनने सिद्धिविनायक गणपतीचे (Siddhivinayak Temple) दर्शन घेतले आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

जॅकलिन फर्नांडिस सिद्धिविनायकला एकटी गेली नसून तिच्यासोबत एलॉन मस्क ( Elon Musk) यांची आईदेखील तेथे उपस्थित होत्या. एलॉन मस्कच्या आईचे नाव माये मस्क (Maye Musk ) आहे. दोघांचे सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी जॅकलिनने गोल्डन रंगाचा सूट परिधान केला होता. पारंपरिक कपड्यात जॅकलिन खूपच सुंदर दिसत होती.

जॅकलिन सिद्धिविनायक मंदिरातील आपला अनुभव शेअर करत म्हणाली, "मला येथे येऊन छान वाटले. माये मस्क यांचे 'अ वूमन मेक्स अ प्लॅन' हे पुस्तक भारतात प्रदर्शित होणार आहे. हे पुस्तक महिला केंद्रीत आहे. वय हा फक्त एक आकडा आहे, जो तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. "

जॅकलिनचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जॅकलिन फर्नांडिस लवकरच आता 'हाऊसफुल ५'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 6 जूनला रिलीज होणार आहे. 'हाऊसफुल ५'मध्ये तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात अक्षय कुमार, संजय दत्त, कीर्ती सेनन, रितेश देशमुख, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, जॉन इब्राहिम असे अनेक कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

SCROLL FOR NEXT