Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez : जॅकलिनसोबतच 'या' फॅशन डिझायनरची होणार चौकशी

सुकेश प्रकरणात रोज नवनवे धागेदोरे हातात येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडमधील (Bollywood) काही अभिनेत्री सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चांगल्याच अडकले आहेत. त्यातील एक अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez). सुकेश प्रकरणात रोज नवनवे धागेदोरे हातात येत आहेत. त्यात बॉलिवूडच्या एक नाही तर पाच प्रसिद्ध अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात जॅकलिनला आज दिल्ली पोलिसांनी तिसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेने (Enforcement Directorate) चौकशीकरिता सकाळी ११ वाजता बोलवले आहे. जॅकलिन सुकेशच्या प्रेमात आंधळी झाली होती. तसेच तिला सुकेशसोबत विवाहदेखील करायचा होता.

आज आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिनसोबतच फॅशन डिझायनर लीपाक्षीला देखील बोलावले आहे. दोघींचीही कदाचित समोरासमोर एकत्रित चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याचे वातावरण पाहता नक्कीच सुकेश प्रकरणात जॅकलिनच्या समस्यांमध्ये चांगलीच वाढ होऊ शकते. सोबतच डिझायनर लिपाक्षीला पोलिसांनी समन्स बजावले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुकेश आणि जॅकलिनची ओळख पिंकी इराणीने करुन दिली होती. नंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिन आणि पिंकी इराणी या दोघींचीही समोरासमोर चौकशी केली होती. चौकशी दरम्यान दोघींनीही एकमेकींवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे दोघीही चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. सोबतच चौकशीसाठी अभिनेत्री नोरा फतेहीला देखील बोलवले होते. सुकेशने नोराला महागडे गिफ्ट दिल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT