Jacqueline Fernandez Saam TV
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez Building Fire Video: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस राहत असलेल्या इमारतीला भीषण आग, VIDEO व्हायरल

Jacqueline Fernandez Building Fire Video: जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग लागल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली. त्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता देखील व्यक्त केली.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस राहत असलेल्या इमारतीला भीषण आग लागली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग लागल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली. त्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता देखील व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील पाली हिल येथील नवरोज हिल सोसायटीमध्ये जॅकलिन फर्नांडिस राहते. याच इमारतील बुधवारी रात्री आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, तीन जंबो टँकर आणि एक ब्रीदिंग व्हॅन तातडीने रवाना करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुणालीही इजा झालेली नाही. इमारतीच्या 13व्या मजल्यावरील स्वयंपाकघराली ही आग लागली होती. (Latest Political News)

जॅकलीन फर्नांडिस या इमारतीतील आलिशान 5 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. जॅकलीनने गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिलच्या आलिशान परिसरात हा फ्लॅट खरेदी केला होता. या इमारतीमध्ये सुट, द पेंटहाऊस, स्काय व्हिला आणि मॅन्शन असे पर्याय आहेत.

जॅकलीन फर्नांडिसचा आगामी प्रोजेक्ट

जॅकलीन लवकरच अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस व्यतिरिक्त रवीना टंडन, दिशा पटानी, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, संजय दत्त, तुषार कपूर, राजपाल यादव, परेश रावल, सुनील शेट्टी आणि लारा दत्ता असे अनेक कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT