Ishita Dutta - Tanvi Thakkar dance on Marathi Song Baharla Ha Madhumas  Saam TV
मनोरंजन बातम्या

Ishita Dutta Share Video: 'बहराला हा मधुमास'वर थिरकल्या Mom To Be अभिनेत्री

Ishita Dutta - Tanvi Thakkar Dance Video: 'बहराला हा मधुमास' या गाण्यावर डान्स केला आहे.

Pooja Dange

Ishita Dutta Instagram Post : 'बहराला हा मधुमास' या महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील गाण्याने अनेकांना वेड लावले आहे. अगदी बॉलिवूड कलाकारांपासून ते परदेशी क्रिएटर्सना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. शिल्पा शेट्टीसह अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील केलं आहे. आता हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि अजय देवगणची ऑन स्क्रिन लेक या गाण्यावर थिरकली आहे.

अभिनेत्री इशिता दत्ताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये इशिता आणि तन्वी ठक्कर एकत्र दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघींनी 'बहराला हा मधुमास' या गाण्यावर डान्स केला आहे. (Latest Entertainment News)

इशिता दत्ता आणि तन्वी ठक्कर दोघीही आई होणार आहेत. दोघींचेही नुकतेच डोहाळ जेवण पार पडले आहे. इशिता आणि तन्वी त्यांच्या प्रेगन्सीचा आनंद घेत आहेत. दरम्यान त्यांनी 'बहराला हा मधुमास'या गाण्यावरील रील करून पोस्ट केला आहे. तर रील पोस्ट करत इशिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'गरोदरपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत.'

डान्स करताना दोघीही खूप आनंदी दिसत आहेत. दोघीनीं डान्स देखील खूप सुंदर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओ अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इशिता आणि तन्वीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

इशिताने 'दृश्यम २'मध्ये अजय देवगणच्या मुलीच्या भूमिका साकारली होती. इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी प्रेमविवाह केला आहे. एका मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली होती.

तन्वी ठक्कर आणि आदित्य कापडिया यांचे देखील २०२१मध्ये लग्न झाले आहे. तो दोघेही आई-बाबा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT