Ishita Datta And Vatsal Sheth Baby Boy Instagram
मनोरंजन बातम्या

Ishita Dutta-Vatsal Sheth Baby Boy : इशिता दत्ताला रुग्णालयातून डिस्चार्ज; पती वत्सल आणि बाळासोबत झाली स्पॉट

Ishita Dutta-Vatsal Sheth Spotted With New Born Baby : इशिताने काही महिन्यांपूर्वी आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.तर आता इशिता आणि वत्सल बाळासोबत हॉस्पिटबाहेर स्पॉट झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ishita Dutta And Vatsal Seth Bring Their Baby Home : 'दृश्यम' फेम अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल शेठ आई-बाबा झाले. इशिता दत्ताने १९ जुलैला एका गोंडस मुलाला जन्म दिला. इशिताने काही महिन्यांपूर्वी आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.तर आता इशिता आणि वत्सल बाळाला घेऊन हॉस्पिटबाहेर स्पॉट झाले.

इशिता आणि वत्सल नेहमी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात.इशिताने डोहाळे जेवणाचे तसेच बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. इशिताच्या गरोदरपणाच्या फोटोंवर चाहत्यांनी मात्र कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता हे दोघेही बाळाला घरी घेऊन जाताना स्पॉट झाले.

इशिता काही दिवसांपूर्वी हॉस्पिटमध्ये अॅडमिट झाली होती. बुधवारी इशिताने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत अशी माहिती दिली होती. बाळ जन्मल्यानंतर लगेचच दोन दिवसांनी इशिताला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

इशिता आणि वत्सल बाळाला घरी घेऊन जाताना दिसले. या वेळी त्यांना पापाराझीसमोर पोझही दिल्या. यादरम्यान वत्सल आणि इशिता दोघेही खूप आनंदी दिसत होते. इशिताने पर्पल रंगाचा ड्रेस घातला होता.तर वत्सलने हिरव्या आणि पर्पल रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती. यावेळी वत्सलच्या हातात बाळ होते. बाळाचा चेहरा मात्र झाकलेला होता.वत्सल आणि इशिताच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

इशिता आणि वत्सल हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. गरोदरपणात इशिता नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत होती. इशिताने तिच्या गरोदरपणाचा पुरेपुर आनंद घेत आहे. असे तिने स्वतः सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या हॅलीपॅड कॅम्पसमध्ये अचानक बैल घुसला; हवालदार जीव मुठीत घेऊन धावला, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : मद्यधुंद कारचालकाने दिली पाच ते सहा वाहनांना धडक

गॅस सिलिंडर तुटवड्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? VIDEO

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

SCROLL FOR NEXT