Arijit Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arijit Singh: अरिजित सिंगने प्लेबॅक सिंगिंगमध्ये खरंच केलं कमबॅक? 'आवारापन २'मधील 'ये आवारापन' गाण्यामुळे चर्चांना उधाण

arijit singh: प्लेबॅक गायनातून निवृत्ती जाहीर केलेल्या अरिजित सिंगचा आवाज 'आवारापन २'मध्ये ऐकू आला. कमबॅक की आधीच रेकॉर्ड केलेलं गाणं, यावर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.

Shruti Vilas Kadam

Arijit Singh: प्लेबॅक सिंगिंग रिटायरमेंटची घोषणा करून चाहत्यांना धक्का देणारा प्रेक्षकांचा लाडका गायक अरिजित सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'आवारापन २' चित्रपटातील 'ये आवारापन' या नव्या गाण्याला त्याने आवाज दिल्याची माहिती समोर आल्यानंतर, त्याने आपला रिटायरमेंटचा निर्णय बदलला का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. २१ जुलै रोजी हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

अरिजित सिंगने २७ जानेवारी २०२६ रोजी प्लेबॅक गायनातून रिटायरमेंट जाहीर केली होती. यापुढे कोणतेही नवीन चित्रपट किंवा गाण्यांचे प्रकल्प स्वीकारणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. त्याच्या या निर्णयामुळे संगीतप्रेमींना वाईट वाटले होते. मात्र, 'आवारापन २'मधील नव्या गाण्यामुळे त्याच्या कमबॅकच्या चर्चांना उधाण आले आहे.

'पिंकविला'च्या वृत्तानुसार, विशेष भट्ट यांनी अरिजित सिंगला या चित्रपटातील 'ये आवारापन' गाण्यासाठी तयार केले. या गाण्याला अमाल मलिक यांनी संगीत दिले असून, रश्मी विराग यांनी गीतलेखन केले आहे.

वृत्तांनुसार, विशेष फिल्म्स आणि अरिजित सिंग यांचे अनेक वर्षांपासून अतूट नाते आहे. 'मर्डर २'मधील 'फिर मोहब्बत' या गाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास 'तुम ही हो', 'मुस्कुराने', 'खामोशियाँ', 'हमारी अधूरी कहानी' आणि 'पल' यांसारख्या सुपरहिट गाण्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे विशेष फिल्म्सच्या आग्रहाखातर अरिजितने हा निर्णय बदलल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अरिजित सिंगने निवृत्तीची घोषणा करतानाच एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली होती. "मी कोणतेही नवीन प्रकल्प स्वीकारणार नाही, मात्र यापूर्वी रेकॉर्ड केलेली किंवा अपूर्ण राहिलेली गाणी पुढील काळात प्रदर्शित होत राहतील," असे त्याने म्हटले होते. त्यामुळे 'आवारापन २'मधील हे गाणे रिटायरमेंटपूर्वीच रेकॉर्ड झाले होते की त्याने खरोखरच प्लेबॅकमध्ये कमबॅक केला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

मोठी बातमी! समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमकं कारण काय?

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

SCROLL FOR NEXT