Malaika Arora Fitness Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Yoga Video : आयटम गर्ल मलायका अरोराचा योग करतानाचा VIDEO बघा!

Malaika Arora Fitness Video : अभिनेत्री मलायका अरोरा हिने योग दिवसानिमित्त योग करतानाचा खास व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओमुळे तिच्या फिटनेसची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

संपूर्ण देशभरात आज (21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2024) साजरा केला जात आहेत. योगा आणि मेडिटेशनमुळे अनेक सेलिब्रिटींच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला आहे. अशा अनेक फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहेत, ज्या कायमच योगा करतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा... अभिनेत्रीने आज योग दिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओमुळे तिच्या फिटनेसची जोरदार चर्चा होत आहे.

मलायका अरोराने आपल्या फिटनेसमुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे. मलायकानं अनेकदा "वय हा केवळ आकडा आहे..." हे सिद्ध केलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील ती खूप फिट दिसते. तिच्या फिटनेसचं सिक्रेट योगा आहे. मलायका दररोज योगा करत असल्यामुळे ती फिट आणि फ्रेश दिसते. ती अनेकदा सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने योग दिवसानिमित्तही योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलेली आहे. यामध्ये ती वेगवेगळे योगा करताना दिसत आहे.

"जर तू नसता तर मी आज कुठे असते, हे मलाच माहित नाही, आजच्या दिवसानिमित्त मी इतकंच म्हणेल." असं व्हिडीओमध्ये मलायका म्हणतेय. सध्या मलायकाच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत असून तिच्या फिटनेसची तुफान चर्चा होत आहे. चपळ आणि लवचित शरीर ठेवण्यासाठी ती कोणकोणते योगासनं करते, हे आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. नियमित योगासनं केल्यामुळे शरीराचं वजन नियंत्रणात राहते आणि ग्लोईंग स्किन कायम राहते. तिचा फिटनेस अनेक तरुणींनाही मागे टाकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, मलायका दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ताजी फळं, इडली, उपमा किंवा मल्टीग्रेन टोस्टसोबत उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग खाते. तर संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मलायका फ्रेश फ्रुट ज्युस, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग आणि ब्राऊन ब्रेड टोस्ट खाते. तर दुपारच्या जेवणात ती २ रोट्या, भात, भाज्या, चिकन आणि स्प्राउट्स खाते. रात्रीचं जेवण हलके ठेवण्यासाठी मलायका रात्री वाफवलेल्या भाज्यांसोबत सॅलड आणि सूप घेते. तिचा हा सर्व आहार अगदी हलक्या प्रमाणात असतो. त्यामुळे ती कायमच फीट राहण्याचा प्रयत्न करते.

सध्या मलायकाची ही इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या फिटनेसचे चाहते कौतुक करीत आहेत. मलायकाच्या योगावरील व्हिडीओवर लाखो लाईक्स मिळाले असून ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT