Nora Fatehi Instagram/@nora_fatehi145
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi Instagram: नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट?

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोरा फतेहीचे इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट आता सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर दिसत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोरा फतेहीचे इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट आता सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाउंट एकतर डिलीट, डिसेबल करण्यात आले आहे किंवा तिला इन्स्टाग्रामनेच ब्लॉक केले आहे. मात्र, याबाबत निश्चितपणे काही तर्क लावणे कठीण आहे. काही वेळापूर्वी नोराने एक फोटो शेअर केला होता, त्यानंतर तिचे इन्स्टाग्राम अकाउंट दिसायचे बंद झाले आहे. त्यामुळे तिचे फॉलोवर्स सध्या गोंधळात आहेत.

नोराचे इन्स्टा डिलीट?
सुमारे 20 तासांपूर्वी नोरा फतेहीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये नोरा फतेही दोन सिंहांसोबत (Lions) दिसत होती. फोटोंमध्ये नोरा नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती, तर कमेंट सेक्शनमध्येही चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करत होते, पण काही वेळाने नोराचे अकाउंट दिसणे बंद झाले आहे.

हे देखील पहा-

इंस्टा 'क्वीन' नोरा फतेही!
नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 37.6 मिलियन फॉलोअर्स होते, तर तिने स्वतः 418 लोकांना फॉलो केले होते. नोरा फतेहीने आतापर्यंत 1611 पोस्ट केल्या होत्या. नोरा फतेहीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. अनेक चाहते नोरा फतेहीला इन्स्टा क्वीन सुद्धा म्हणत असत. नोरा फतेहीच्या स्टाइल आणि किलर डान्स मूव्हचे सर्वांनाच वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT