मनोरंजन बातम्या

Shocking : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अचानक पार्टीतून बेपत्ता; शोधाशोध केल्यानंतर सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

Shocking news : इन्फ्लुएन्सर अचानक पार्टीतून बेपत्ता झाली. त्यानंतर शोधाशोध सुरु केल्यानंतर तिचा मृतेदह सुटकेसमध्ये आढळला.

Vishal Gangurde

हॉलिडे पार्टीतून बेपत्ता इन्फ्लुएन्सर स्टेफनीचा मृत अवस्थेत सापडली

तिच्या एक्स-बॉयफ्रेंडने गळा दाबून हत्या केल्याचं उघड

त्याने मृतदेह जंगलात फेकल्याचे पोलिसांनी सांगितलं.

तिच्या मृत्यूने चाहते आणि कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ

Stefanie Pieper Death : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आता प्रचंड चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा असतो. मात्र, ऑस्ट्रेलियातील इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर घडलं आहे. इन्फ्लुएन्सर स्टेफनी पीपरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉलिडे पार्टीमधून बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला. इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

३१ वर्षीय स्फेटनीचा जंगलात एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळला. स्टायरिन राज्याच्या पोलिसांच्या माहितीनुसार, स्टेफनी फोटोशूटसाठी आली नाही, त्यावेळी तिच्या मित्रांना ती बेपत्ता झाल्याचं समजलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिची गळा दाबून हत्या केली.

स्टेफनीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. स्टेफनीची हत्या करणारा आरोपी अनेक वेळा स्लोवेनिया येथे गेला होता. स्टेफनीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. स्टेफनीच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी तातडीने सुरु केला.

स्टेफनी पीपर ऑस्ट्रियाच्या गीडॉर्फ जिल्ह्यातील एक ब्युटी इन्फ्लुएन्सर आणि मेकअर आर्टिस्ट होती. तिच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती गायिका देखील होती. स्टेफनी पीपरच्या मृत्यूने तिचे चाहते आणि कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

स्टेफनीचा मृतदेह कधी सापडला?

मीडिया रिपोर्टनुसार, स्टेफनी पीपर बेपत्ता झाल्यानंतर साधारण ५ दिवसांनी मृतदेह सापडला. स्टेफनीचा मृतदेह शुक्रवारी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी सापडला. या प्रकरणात पोलिसांनी स्टेफनीच्या एक्स-बॉयफ्रेंडला अटक केली आहे. त्याने चौकशीत हत्या केल्याचा गुन्हा कबुल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT