Indias Got Talent 11 Winner saam tv
मनोरंजन बातम्या

भारताला मिळालं नवं टॅलेंट; Indias Got Talent 11 चं विजेतेपद 'या' टीमने पटकावले, बक्षिसात काय काय मिळाले?

Indias Got Talent 11 : 'इंडियाज गॉट टॅलेंट 11'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. विजेत्या टीमला तब्बल 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

Shreya Maskar

'इंडियाज गॉट टॅलेंट 11' चा थाटात ग्रँड फिनाले पार पडला आहे.

'अमेझिंग अप्सरा' टीमने 'इंडियाज गॉट टॅलेंट 11' चे विजेतेपद पटकावले.

'इंडियाज गॉट टॅलेंट 11' च्या विजेत्याला ट्रॉफी आणि रक्कम मिळाली.

'इंडियाज गॉट टॅलेंट 11' चा थाटात ग्रँड फिनाले पार पडला आहे. देशभरातील स्पर्धकांनी तीन महिने चाललेल्या या कार्यक्रमात आपली कला दाखवली आणि परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली. रविवारी, शोच्या विजेत्याला मुकुट देण्यात आला. कोलकात्याची लोकप्रिय डान्स टीम 'अमेझिंग अप्सरा' ने 'इंडियाज गॉट टॅलेंट 11'चे विजेते पद भूषवले आहे.

कोलकात्याचा महिला डान्स गट 'अमेझिंग अप्सरा'ने 'इंडियाज गॉट टॅलेंट 11' चा किताब जिंकला आहे. 'अमेझिंग अप्सरा'ने आपल्या भन्नाट डान्स शैलीने हे यश मिळवले आहे. संपूर्ण पर्वात 'अमेझिंग अप्सरा'ने शास्त्रीय आणि समकालीन नृत्य शैलींच्या मिश्रणाने सर्वांना भारावून टाकले. सध्या या टीमवर चाहते, कलाकार, प्रेक्षक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

बक्षिस काय?

'इंडियाज गॉट टॅलेंट 11' चा विजेता गट 'अमेझिंग अप्सरा'ला ट्रॉफी, एक कार आणि 15 लाख रुपये मिळाले आहे. त्यांचा आनंद गगनात मावेनासा आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट 11' मध्ये सात गट अंतिम फेरीत पोहोचले. सिक्कीमचा संगीत बँड-साउंड ऑफ सोल्स यांनी उपविजेते पदाचा मान पटकावला.

ग्रँड फिनालेला प्रत्येक स्पर्धकाने आपले कौशल्य दाखवले. परीक्षक आणि लोकांच्या मतांवर आधारित 'अमेझिंग अप्सरा'ला 'इंडियाज गॉट टॅलेंट 11' चा विजेता म्हणून मुकुट देण्यात आला. हा शो जगात खूप प्रसिद्ध आहे. पहिल्या दिवसापासून 'अमेझिंग अप्सरा'ने आपल्या कलेची जादू दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट 11' सीझन ऑक्टोबर 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. नवजोत सिंग सिद्धू, गायक शान आणि मलायका अरोरा यांनी संपूर्ण सीझन जज केले. तर हर्ष लिंबाचियाने शोचे सूत्रसंचालन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, तर या ५ राशींना मिळेल आर्थिक लाभ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणेशोत्सवात पुण्यात ट्रॅफिकचा मोठा बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यासह 'या' मार्गांवर वाहतूक बंद

Maharashtra News Live Update: सांगली भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक खेळणी गौराईचं घरोघरी आगमन..

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT