Swargandharva Sudhir Phadke Biography Trailer You Tube
मनोरंजन बातम्या

Swargandharva Sudhir Phadke: ‘जे माझ्या मनाला भावतं, ते माझ्या संगीतातून आणि गळ्यातून उतरतं...’; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर प्रदर्शित

Swargandharva Sudhir Phadke Biography Trailer: रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या 'बाबुजीं'ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला हा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Swargandharva Sudhir Phadke Biography Trailer

स्वरगंधर्व सुधीर फडके... अनेकांच्या घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव. मराठी- हिंदी गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात आपला ठसा उमटवलेला आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

'गीतरामायणा'तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी 'बाबुजीं'नी मराठी मनावर राज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या 'बाबुजीं'ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या १ मे ला चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रपटातील ‘गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही पाहायला मिळाली.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या माध्यामतून ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ म्हणजेच बाबुजींच्या आयुष्यातील अनेक पैलु आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचा सुरूवातीचा संघर्षाचा काळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे. सांगितिक मैफल घडवणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात, ‘जे माझ्या मनाला भावतं, ते माझ्या संगीतातून आणि गळ्यातून उतरतं...’ या डायलॉगने होते. मुंबईतला परतीचा प्रवासापासून तर एक उत्तम संगीतकार होण्याचा प्रवास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट म्हणजे संगीतप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार, हे नक्की. चित्रपटामध्ये ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ यांचे पात्र अभिनेता सुनील बर्वेने साकारले असून मृण्मयी देशपांडेने त्यांच्या पत्नीचे पात्र साकारले आहे.

चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे. सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. योगेश देशपांडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांनी स्वत: लिहिलेले आहे.

राज ठाकरे यांनी चित्रपटाबद्दल सांगितले की, "मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. पण, माझ्या वडिलांचे आणि बाबुजींचे फार जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. पण, कदाचित हा योग मला सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे, उभारी देणे, मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल."

तर चित्रपटाबद्द योगेश देशपांडेंनी सांगितले की, "स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुतच आहे. परंतु इथंवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास खडतर होता. त्यांच्या या प्रवासात पत्नी ललिताबाई, ग. दि. माडगुळकर हे त्यांच्या सोबत होते. परंतु या प्रवासात त्यांना अनेकांनी साथ दिली. त्यांच्या भावसंगीताचा हा रंजक प्रवास चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT