Indian Idol 15 Winner SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indian Idol 15 Winner: 'इंडियन आयडल 15' जिंकली, २५ लाख मिळाले, आता मानसी घोष काय करणार?

Manasi Ghosh Prize Money : 'इंडियन आयडल 15'ची विजेता मानसी घोष झाली आहे. तिला २५ लाख रुपये प्राईज मनी मिळाली आहे. या पैशांचे ती नेमकं काय करणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

गाण्यांचा लोकप्रिय शो 'इंडियन आयडल 15' चा (Indian Idol 15) ग्रँड फिनाले 6 एप्रिलला पार पडला. 'इंडियन आयडल 15'ची ट्रॉफी कोलकाता येथे राहण्याऱ्या मानसी घोषने उचलली आहे. मानसीने वयाच्या 24 व्या वर्षी हे यश संपादन केले आहे. मानसी घोषने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना कायमच मंत्रमुग्ध केले. सध्या मानसीवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा, कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिने 'इंडियन आयडल 15' पूर्ण प्रवासात सुपरहिट गाणी गायली आहे.

मानसी घोषला बक्षीस काय मिळाले?

मानसी घोषला (Manasi Ghosh Prize Money ) 'इंडियन आयडल 15'ची ट्रॉफी आणि 25 लाख रुपये बक्षीसाची रक्कम मिळाली आहे. 'इंडियन आयडल 15'च्या ट्रॉफीवर मानसी घोषने आपले नाव कोरले आहे. मानसीने आपल्या आवाजाने कायमच परीक्षकांचे मन जिंकले आहे.

मानसी घोष प्राईज मनीचे काय करणार?

मानसी घोषने सांगितले की, "मला मिळालेली प्राईज मनी मी इंडिपेंडेंट म्युझिकवर खर्च करणार आहे. तसेच मी नवीन गाडीवर उरलेली रक्कम खर्च करेल"

बॉलिवूडचे पहिलं गाणं

मानसी घोषचे लवकरच पहिले बॉलिवूड गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे ललित पंडित आणि शान यांच्या सोबत आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. हे गाणे एका चित्रपटासाठी आहे.

टॉप-३ कोण?

मानसी घोषने विजेते पद पटकावले. तर शुभोजीत चक्रवर्ती फर्स्ट रनर अप ठरला आणि स्नेहा शंकर सेकंड रनर अप झाली. दोन्ही रनर अप विजेत्यांना 5 लाखांची प्राईज मनी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढले

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT