Abhijeet Sawant Reacts To Amit Sana's Shocking Claim Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amit Sana's Shocking Claim: ‘अभिजीतला जिंकवण्यासाठी माझ्या वोटिंग लाइन्स बंद केल्या‘; १९ वर्षांनंतर इंडियन आयडॉलविषयी अमित सानाने केला धक्कादायक खुलासा

Amit Sana's News: १९ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर गायक अमित सानाने एक मोठा खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Abhijeet Sawant Reacts To Amit Sana's Shocking Claim

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडियन आयडल’ची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते. या शोचा पहिला सीझन २००४ मध्ये प्रसारित झाला होता. ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीझनचा विजेता गायक अभिजित सावंत ठरला होता. तर उपविजेता अमित साना ठरला होता. तब्बल १९ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर गायक अमित सानाने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने केलेल्या खुलाशानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीझनमध्ये अभिजीत सावंतला जिंकवण्यासाठी माझ्या व्होटिंग लाईन्स बंद केल्या, असल्याचा आरोप अमित सनाने एका मुलाखतीत केली आहे. त्याने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा त्याने केला. अमित सनाने मुलाखतीत सांगितले, “अभिजीत सावंतला जिंकवण्यासाठी मुद्दाम माझ्या व्होटिंग लाईन्स बंद केल्या होत्या. तो जिंकावा म्हणून दोन दिवस अगोदरच माझ्या व्होटिंग लाईन्स बंद करुन टाकल्या होत्या.” (Singer)

इतक्या वर्षांनंतर या मुद्द्यावर बोलल्यामुळे अमितने अभिजीतची मुलाखतीत माफीदेखील मागितली आहे. अभिजितला फक्त लोकांनी फक्त प्रसिद्धी दिली, पण लोकांनी मला गांभीर्याने घेतले, अशी प्रतिक्रियाही अमितने दिली. अमितने मुलाखतीत अभिजीतसोबत राहुल वैद्यबाबतही मोठं वक्तव्य केलं. ‘माझ्यामध्ये आणि राहुलमध्ये अनेकदा भांडणं झाली आहेत. त्याला शोमध्ये एक तगडा कंटेस्टंट म्हणूनही दाखवायचं होतं. त्याचे राजकीय क्षेत्रातही संबंध आहेत.’

‘इंडियन आयडल’नंतर, अमित सनाने ‘जो जीता वही सुपरस्टार’ या शोमध्येही सहभागी झाला होता. पण त्या शोमधून तो लवकर बाहेर पडला. त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांमध्ये, प्ले बॅक सिंगर म्हणून काम पाहिले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT