Indian Cricketer Yuvraj Singh Biopic Saam TV
मनोरंजन बातम्या

Yuvraj Singh : क्रिकेटर युवराज सिंगच्या आयुष्यावर येणार चित्रपट; मुख्य भूमिकेत कोण?

Shreya Maskar

भारतीय क्रिकेट (Indian Cricket ) संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे विश्वचषकाच्या विजयाचा हिरो असलेल्या युवराजच्या आयुष्यावर चित्रपट येतोय. २०११ च्या वनडे विश्वचषकावेळी युवारजला कॅन्सर झालेला होता, पण त्यानं मैदान सोडलं नाही. युवराजच्या आयुष्यातील थरार आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

६ बॉलवर ६ षटकार ठोकणारा भारतीय क्रिकेटर युवराज सिंगने क्रिकेटविश्वात अनेक विक्रम केले आहेत, ज्याची चर्चा आजही होते. युवराजच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकची अधिकृत घोषणा झाली असून चाहते आतापासून चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण युवराजची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी अद्यापही अभिनेत्याची निवड करण्यात आली नाही आहे.

आतापर्यंत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni ), मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कपिल देव या दिग्गज क्रिकेटपटूंचे वैयक्तिक आयुष्य पडद्यावर आणले गेले आहे. आता भारतीय क्रिकेटर युवराज सिंगची वेळ आली आहे. त्याच्या आयुष्याचा संघर्ष उलगडण्याचा आणि लोकांपर्यंत पोहचवण्याचा. युवराज सिंगचा (Yuvraj Singh) प्रवास पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.युवराजने त्याच्या व्यावसायिक जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत.२०११ मध्ये युवराज ला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशीही लढावे लागले होते. मात्र, कॅन्सरला हरवून त्याने टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठा हातभार लावला. आता जेव्हा युवराज सिंगच्या बायोपिकमधून त्याच्या अनेक कथा आणि भावनिक क्षण उलगडतील तेव्हा त्याची कहाणी नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल.

युवराज सिंगच्या बायोपिकसाठी दोन दावेदार

युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा झाल्यापासून दोन बॉलिवूड कलाकारांची नावे सतत चर्चेत आहेत. यामध्ये पहिले नंबर बॉलिवूडचा दमदार अभिनेता रणवीर सिंहचा येतो. रणवीरने कपिल देवच्या बायोपिकमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे. तर विकी कौशल देखील या भूमिकेसाठी चर्चेत आहे. प्रेक्षक मते विकी कौशल युवराज सिंगच्या बायोपिकसाठी परफेक्ट वाटत आहे. कारण लोकांना यांची स्टाईल सारखी वाटत आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंहने (Ranveer Singh)त्याच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत मोठ्या पडद्यावर अनेक कठीण भूमिका खूप प्रभावीपणे साकारल्या आहेत. त्याचे बाजीराव मस्तानी आणि पद्मावत हे दोन चित्रपट खूप गाजले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर देखील चांगली कमाई केली आहे. 'पद्मावत'मधली खिलजीची भूमिका असो किंवा 'बाजीराव मस्तानी'मधली बाजीरावाची भूमिका रणवीर प्रत्येक पात्रात जीव ओतला आहे. कपिल देव यांच्या बायोपिकसाठी देखील रणवीरने खूप मेहनत घेतली होती. पात्र कोणतही असो रणवीर सिंह त्यात जीव ओततो. त्याच्या या शैलीमुळेच तो युवराज सिंहच्या बायोपिकसाठी देखील योग्य आहे. रणवीर सिंह प्रत्येक चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा जगतो.

विकी कौशल

युवराज सिंगच्या बायोपिकसाठी अनेक चाहत्यांची विकी कौशल (Vicky Kaushal)पसंती आहे. विकीने अनेक चित्रपटांमध्ये कमाल कामगिरी केली आहे. सरदार उधम सिंह, सॅम माणेकशॉ सारख्या दमदार भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. विकीचे त्याच्या जबरदस्त अभिनयासाठी नेहमीच कौतुक झाले आहे. त्यांची उंची आणि शरीरयष्टी पाहता विकी युवराजच्या बायोपिकसाठी योग्य असल्याचे दिसते. अद्याप निर्मात्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT