Urvashi Rautela And Rishabh Pant  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rishabh And Urvashi: ऋषभ- उर्वशीच्या प्रेमाची कबुली मित्राने दिली, खुलास्याने सर्वांच्याच नजरा उंचावल्या

शुभमनने 'दिल दियां गलां' या चॅट शोमध्ये 'उर्वशी आणि ऋषभ'च्या नात्यावर भाष्य केले आहे. त्याच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rishabh And Urvashi: सध्या भारतीय क्रिकेट संघ टी-20 मालिकेसाठी परदेशात आहे. या दरम्यान काही खेळाडू सर्वाधिक चर्चेत आले आहे. ऋषभ पंत न्युझिलंडमध्ये असून त्याला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार पद सोपवले आहे. सध्या ऋषभची जोडी उर्वशीसोबत जोडली जात आहे. खरं तर कलाकारांचे आणि खेळाडूंचे प्रेम हे काही नवीन नाही.

अशा अनेक जोड्या आपण याआधी पाहिल्या आहेत. अनुष्का- विराट यांचे प्रेम जग जाहीर असून आथिया- राहूल ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दरम्यान उर्वशी वर्ल्डकप दरम्यान दुबईमध्ये टीम इंडियाच्या आनंदात सहभागी होताना दिसली. पंतच्या एका सहकाऱ्याने त्यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. तो सहकारी म्हणजे शुभमन गिल.

भारत- न्युझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यातही पावसाचा धोका कायम आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. शुभमनने 'दिल दियां गलां' या चॅट शोमध्ये त्यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. त्याच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या शो दरम्यान शुभमनला प्रश्न विचारण्यात आला की, 'उर्वशी रौतेलाच्या नावाने ऋषभ पंतला खूप चिडवले जाते. संघातील सहकारीही असेच करतात का?' यावर गिल म्हणतो, त्याचा ऋषभ पंतशी काहीही संबंध नाही. ती स्वतः कोणत्याही विषयामुळे चर्चेत असते.

शुभमन गिलला पुढे विचारण्यात आले की, 'ऋषभ पंतला या सगळ्याचा फटका बसला आहे का?' यावर शुभमन गिल म्हणतो, नाही, त्याला या गोष्टीचा काहीच फटका बसला नाही. कारण ऋषभ आणि उर्वशीच्या नात्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नाही.

उर्वशी आणि ऋषभ यांच्यातील भांडण एका मुलाखतीपासून सुरू झाल्याची माहिती आहे. उर्वशीने दावा केला होता की, एक व्यक्ती, ज्याला ती मिस्टर आरपी म्हणते, तो तिला भेटण्यासाठी अनेक वेळा फोन करत होता. तो तिच्यावर प्रेमसुद्धा करत होता.

आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने नंतर या विधानावर जोरदार टीका केली आणि उर्वशीला बहिणीला फोन करून असे विधान करू नये असे सांगितले. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात, असेही तो यावेळी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT