Sonu Sood Son Started Helping Needy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Son: बापापेक्षा बेटा सवाई! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला सोनू सूदचा मुलगा, व्हिडिओ व्हायरल

Sonu Sood Son Eshaan Help People: सोनू सूदच्या अनुपस्थितीत, त्याचा मुलगा ईशान याने लोकांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Pooja Dange

Eshaan Sonu Sood Video Viral: अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेकांची मदत केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचलेल्या सगळ्यांपर्यंत पोचण्याचा सोनू सूदने प्रयत्न केला. कोरोनानंतर देखील सोनू सूदने गरजूंची मदत करणे थांबवले नाही. जेव्हा अभिनेता मुंबईत त्याच्या घरी असतो तेव्हा त्याच्याकडे मदतीच्या आशेने येणारा कोणीही निराश होणार नाही याची तो काळजी घेतो.

सोनू सूदच्या अनुपस्थितीत, त्याचा मुलगा ईशान याने लोकांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ईशानचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर युजर्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सोनू सूद सध्या त्याचा आगामी चित्रपट 'फतेह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे अमृतसरमध्ये शूटिंग करत आहे. मात्र, तिथेही सोनू लोकांना सतत मदत करत आहेत. सोनूच्या अनुपस्थितीत त्याच्या मुलाने मुंबईतील लोकांची मदत करण्याची जबाबदारी सांभाळली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सोनूचा मुलगा अभिनेत्याच्या घराखाली उभ्या असलेल्या लोकांना मदत करत आहे, त्यांच्या व्यथा ऐकत आहे.

सोनू सूदच्या मार्गावर चाललेल्या मुलाचे हे चांगले काम पाहून चाहते सोनू सूदचे कौतुक करताना थकत नाहीत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हे कुटुंब नेहमीच लोकांच्या मदतीला हजर असते. देशभरातील सर्व श्रीमंत आणि मोठ्या कुटुंबांपेक्षा हे कुटुंब खूप मदत करत आहेत.

ना बोंबाबोंब, ना रॅली, फक्त काम. त्यांचे काम बोलत आहे. देव त्यांच्या कुटुंबाचे प्रत्येक वाईट गोष्टीपासून रक्षण करो'. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आम्हाला तुझा खूप अभिमान आहे बेटा'.

आणखी एका युजरने लिहिले की, 'आपण सर्वजण त्याच्या फतेह चित्रपटाला खूप सपोर्ट करू या, जेणेकरून सोनू सूद या सर्व गरजू लोकांना मदत करू शकेल, पण चित्रपट कितीही बकवास असला तरी त्यांना हजार कोटींपर्यंत पोचवतो. आता सरांच्या चित्रपटाला शक्य तितके सपोर्ट करूया.'

सोनू सूदनेच्या मागे कोणतीही मोठी टीम नाही. तो स्वतः ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून मदत करण्याचे काम करतो. अलीकडेच सोनू सूदने ट्री मॅन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीला मदत केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Fact Check: सरकार मुलींना खरंच देणार २ लाख रुपये? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Raju Shetty : वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा; राजू शेट्टी यांची मागणी

RBI Governor Shaktikanta Das: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पुढच्या महिन्यात एसी लोकल धावणार, १२ फेऱ्या वाढणार

SCROLL FOR NEXT