'राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली तर तो समाजाला चुकीचा संदेश जाईल' 
मनोरंजन बातम्या

'राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली तर तो समाजाला चुकीचा संदेश जाईल'

कुंद्रा लंडनला फरार होऊन पुन्हा अश्लील व्हिडिओ अपलोड करू शकतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॉर्न फिल्म प्रकरणी (Porn Film Case) अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राची (Raj Kundra) जामिनावर (Bail) सुटका झाली तर तो समाजाला चुकीचा संदेश जाईल, अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्याचबरोवर पोलीसांनी भक्कम पुराव्यासह युक्तीवादही केला. राज कुंद्राच्या जामिनाच्या अर्जावर मंगळवारी न्यायालयात झालेल्या सुनावणी झाली. यावेळी राज कुंद्राला सोडले तर तो पुन्हा पॉर्न फिल्म बनवू शकतो, असे पोलीसांनी म्हटले. (If Raj Kundra is released on bail, it will send the wrong message to the society)

- मलाही जामीन मिळावा

सुनावणीवेळी बोलताना राज कुंद्रा म्हणाला की, जर आरोपपत्रात नमुद केलेल्या आरोपींची जामीनावर सुटका होऊ शकते, तर मलाही जामीन मिळावा. मॅजिस्ट्रेट कोर्टाने माझा जामीन फेटाळून चूक केली आहे. सर्व ऑर्डर अंदाजावर आधारित आहेत. त्यामुळे ते रद्द करावे. तसेच, कथित गुन्ह्यात आपला कोणताही सहभागाचा पुरावा नाही, असेही त्याने म्हटले आहे.

- पोलीसांनी काय म्हटले

या जामीन अर्जाला उत्तर देताना पोलिसांनी सांगितले की, हे गंभीर गुन्ह्याचे प्रकरण आहे. आम्ही सर्व व्हिडिओ कुठे अपलोड केले आहेत याचा तपास करत आहोत. जर आरोपींना जामीन मिळाला तर ते पुन्हा गुन्ह्याची पुनरावृत्ती करू शकतात. त्याचा आपल्या संस्कृतीवर गंभीर परिणाम होईल. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. इतकेच नव्हे तर, कुंद्रा लंडनला फरार होऊन पुन्हा अश्लील व्हिडिओ अपलोड करू शकतो, असेही पोलीसांचे म्हणणे आहे.

कुंद्रा हा फरार आरोपी प्रदीप बक्षीचा नातेवाईक आहे. तसेच, तो कुंद्रा एक ब्रिटिश नागरिक आहे. जर त्याची जामिनावर सुटका झाली तर तो नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारखा फरार होण्याची शक्यता आहे. ते परदेशात जातील आणि तेथून आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ अपलोड करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी पोलिसांनी केलेल्या या हरकती न्यायालयानेदेखील काळजीपूर्वक ऐकल्या.

- कुंद्राच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 20 ऑगस्ट रोजी

खरे तर पोलीस राज कुंद्राला पॉर्नोग्राफी रॅकेटचा सूत्रधार मानत आहेत. पुनर्प्राप्त केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्स या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा परदेशातही प्रसार झाल्याचे आढळून आले आहे. कुंद्राच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता 20 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad smell in car: कोणत्या कारणांमुळे कारमध्ये दुर्गंधी येऊ लागते?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT