Hruta Durgule News, entertainment news marathi, Hruta Durgule Instagram Followers
Hruta Durgule News, entertainment news marathi, Hruta Durgule Instagram Followers  Saam Tv
मनोरंजन बातम्या

इंस्टाग्रामवर हृताचीच हवा; 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार करणारी पहिली मराठमोळी अभिनेत्री

Shivani Tichkule

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेचा (Hruta Durgule) मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर हृताने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यातच आता हृताने इंस्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. हृता ही इंस्टाग्रामवर (Instagram) सर्वात जास्त फोलअर्स असलेली पहिलीच मराठी मनोरंजनसृष्टीतली अभिनेत्री (Actress) आहे. (Entertainment news Marathi)

हे देखील पाहा -

हृता फुलपाखरू मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने स्टार प्रवाहच्या दुर्वा मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. झी युवाच्या फुलपाखरूमधील तिच्या वैदेहीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली. २०२१ मध्ये तिने सोनी मराठीचा सिंगिंग रिॲलिटी शो सिंगिंग स्टार होस्ट केला. सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दीपिका देशपांडेची मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच हृता दुर्गुळेने तिचा बॉयफ्रेंड टीव्ही आणि चित्रपट दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न केले.

हृता दुर्गुळेच्या 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहे. त्यानंतर आता हृताचा 'अनन्या' आणि 'टाईमपास 3' हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृताचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. 'टाईमपास 3' हा चित्रपट 3 जूनला प्रदर्शित होणार आहे. तर 'अनन्या' चित्रपट 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२०१९ मध्ये तिचे मराठी टेलिव्हिजनमधील सर्वात आकर्षक महिला म्हणून वर्णन केले गेले. ती सर्वात लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. हृता मराठी इंडस्ट्रीमध्ये "महाराष्ट्राची क्रश" म्हणून ओळखली जाते. २०२२ मधील टॉप ५ मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रींमध्ये ती पहिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेणार

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT