Hritik Roshan Google
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिकचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है'ला 25 वर्षे पूर्ण, शेअर केल्या 27 वर्षांच्या जुन्या नोट्स, भावुक होऊन म्हणाला...

Hrithik Roshan: बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने सोशल मिडीयावर 'कहो ना प्यार है' चित्रपटाची २७ वर्षे जुनी नोट्स शेअर करत एक भावुक कॅप्शन लिहिले आहे.

Shruti Vilas Kadam

Hrithik Roshan: बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने २५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याच्या पहिल्याच चित्रपटामुळे तो बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला. २००० मध्ये राकेश रोशन यांनी 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिक रोशन आणि अमीषा पटेल यांना लाँच केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट त्या काळातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता या चित्रपटाची गाणी, संवाद आणि कथा लोकांना खूप आवडली. 'कहो ना प्यार है' चित्रपटाचे बजेट १० कोटी रुपये होते, तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ७८.९३ कोटी रुपये कमावले. हृतिक या चित्रपटाची तयारी करत होता, तेव्हा त्याने काही नोट्स लिहिल्या, या नोट्स त्याने २७ वर्षांनंतर सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत.

हृतिक रोशनने त्याच्या 'कहो ना प्यार है' या पहिल्या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. या निमित्ताने हृतिकने इंस्टाग्रामवर नोट्स शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, '२७ वर्षांपूर्वीच्या माझ्या नोट्स. माझ्या पहिल्या चित्रपट 'कहो ना प्यार है' साठी अभिनेता म्हणून तयारी करताना मी खूप घाबरलो होतो. प्रत्येक चित्रपट सुरू करताना मला अजूनही भीती वाटते.

त्याने पुढे लिहिले की, '२५ वर्षे इंडस्ट्रीत राहिल्यानंतर, मला वाटते की मी आता मी माझ्या भीतीवर मात केली आहे. मी हे नोट्स पाहतो आणि विचार करतो की तेव्हापासून आतापर्यंत काय बदलले आहे आणि मला असे वाटते की काहीही बदललेले नाही. मला माझ्या कामाचा अभिमान आहे आणि या चित्रपटसृष्टीत अजूनही खूप काही करायचे आहे.

हृतिक पुढे म्हणाला, 'कहो ना प्यार है' ला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या स्क्रिप्टच्या कॉपीमध्ये लिहिलेली प्रत्येक ओळ मला दिलासा देते. या स्क्रिपच्या पहिल्या पानावर 'एक दिवस' लिहिले आहे. पण तो कधीच आला नाही किंवा कदाचित आलाही असेल पण मी कामात गुंगलो आणि मला त्या पहिल्या दिवसाबद्दल कळलच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT