Hrithik Roshan Tiger 3 Saam Digital
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Tiger 3: 'टायगर ३'मध्ये ह्रतिक रोशन करणार 'कॅमिओ'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hrithik Roshan Tiger 3

सुपरस्टार सलमान खानचा 'टायगर ३' चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होत आहे. यशराज फिल्म निर्मित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अॅक्शन चित्रपट पठाणमध्ये सलमान खानने भूमिका साकारली होती. त्यामुळे शाहरुख खान टायगर ३ मध्ये 'कॅमिओ' करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता केवळ शाहरुखच नाही तर ह्रतिक रोशन सुद्धा टायगर ३ मध्ये झळकण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समध्ये टायगर, पठाण आणि कुबेर एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. सलमान खान, शहारुख खान आणि ह्रतिक रोशनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून थिएटरमध्ये एकाचवेळी तिघांच्याही फॅन्सची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याची खात्री देता येत नाही. १२ नोव्हेंबर रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर यावर विश्वास ठेवता येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' च्या यशानंतर 'टायगर ३' हा यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्स सलमान खान, कतरिना कैफ यांनी भूमिका साकारलेला हा तिसरा मोठा चित्रपट आहे. या अॅक्शन चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनडूनही प्रमाणपत्र मिळालं आहे. इंडस्ट्रीतले पाच मोठे कलाकार या चित्रपटात झळकणार असल्यामुळे दिवाळीचं खास सरप्राईज चाहत्यांना मिळणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ पासून चित्रपटाचे शो सुरू होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

SCROLL FOR NEXT