Bollywood Richest Star kid  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Star kid पासून सुरुवात, आता यशाच्या शिखरावर, स्वत:च्या हिंमतीवर उभारली कोट्यवधीची संपत्ती

Bollywood Richest Star kid : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी इंडस्ट्रीत स्वतः ची ओळख तयार केली आहे. यातील सर्वात श्रीमंत स्टारकिड कोण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडमध्ये नेहमीच स्टारकिड्स वरून चर्चा पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकिड्स आहेत ज्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत आपले नाव कमावले आहे. यात टायगर, वरुण, आलिया यांचा समावेश आहे. मात्र बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत स्टारकिड (Bollywood Richest Star kid) दुसरा तिसरा कोणी नसून हृतिक रोशन हा आहे.

हृतिक रोशन हा अभिनेता राकेश रोशन (Hrithik Roshan) यांचा मुलगा आहे. हृतिक उत्तम डान्सर आहे. हृतिकने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निमार्ण केली आहे. हृतिक रोशनने आपल्या कारकि‍र्दीत अनेकल हिट चित्रपट केले आहेत.

हृतिक रोशन चित्रपटासोबतच अनेक जाहिराती देखील करतो. तसेच त्याचा स्वतः चा व्यवसाय देखील आहे. हृतिकचा HRX या नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशनचा व्यवसाय तब्बल 1000 कोटींच्यावर पोहोचला आहे. हृतिक रोशनची एकूण संपत्ती 2000 कोटींहून अधिक आहे.

बॉलिवूडमध्ये ह्रतिक रोशनची स्टायलिश आणि चार्मिंग अभिनेता म्हणून ओळख आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. हृतिक रोशनने सुझान खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सबा आझादसोबत तो रिलेशनशिप आहे. ती दोघ अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. हृतिक रोशनला त्याच्या या रिलेशनशिपमुळे अनेक वेळा ट्रोल देखील करण्यात आले आहे. घटस्फोटानंतर हृतिक – सुझान अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले. तसेच सुझान खान आणि सबा आझाद यांच्यातही चांगली मैत्री आहे असे बोले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ, 2nd Test: 4331 दिवसांनंतर भारताचा मायदेशात पराभव! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

Thackeray Vs Sharad Pawar Group: ठाकरे - शरद पवार गट आमनेसामने, एकाच जागेवरून दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर; होणार मैत्रीपूर्ण लढत?

Bone Health: 'हे' गुणकारी पदार्थ मुलांची हाड करतीस मजबूत

Maharashtra News Live Updates: येवला मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदेंना उमेदवारी

Arjun Kapoor: दमदार अभिनय अन् हटके स्टाइल स्टार अर्जुन आहे धनाढ्य, संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT