Hrithik Roshan Hod Girlfriend Saba Azad's Hills Instagram @amitaggarwalofficial
मनोरंजन बातम्या

Hritik Roshan Photo: जोडीदार असावा तर असा! सर्वांसमोर हृतिकने केलेल्या कृतीचे होतेय कौतुक

Hrithik Roshan and his girlfriend Saba Azad: सबा आणि हृतिकच एक फोटो व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Hrithik Roshan Hod Girlfriend Saba Azad's Hills: हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या प्रेमाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. काल देखील हृतिक आणि सबाच्या फोटोवर सुझेनने कमेंट केल्याने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष तिथे होते. आज सबा आणि हृतिकच एक फोटो व्हायरल होत आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद, बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारे जोडपे आहे. हृतिक आणि सबाने करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले. हृतिक आणि सबा नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करतात, तसेच त्यावर कमेंट करून नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करतात.

मंगळवारी फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी NMACC इव्हेंटमधील फोटो शेअर केला आहेत. या फोटोंमध्ये हृतिक आणि सबा देखील दिसत आहेत. एका फोटोमध्ये सबा आझाद अनवाणी असून तिच्या लाल ड्रेसमध्ये डिझायनरसोबत पोज देत आहे.

तर अमित अग्रवाल याने सबासोबत शेअर केलेल्या या फोटोमध्ये हृतिक सुद्धा दिसत आहे. पण हृतिक त्यांच्यासोबत फोटो काढत नसून मागे उभा आहे आणि एका व्यक्तीशी बोलत आहे. हा फोटो निरखून पहिला तर तुमच्या लक्षात येईल की, हृतिक हातात चपला घेऊन उभा आहे. तर फोटोत सबा अनवाणी आहे. त्यामुळे हृतिक सबाच्या चपला घेऊन उभा असल्याचे कोणीही सहज सांगेल.

हृतिक रोशनच्या या कृत्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहेत. हृतिकच्या या फटोवर कमेंट्स पाऊस पडत आहे. या फोटोवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, "हृतिक रोशन किती कॅज्युली ते सँडल पकडले आहे हे मला आवडले!" हृतिकने केलेल्या या सहजकृत्याचे सगळीकडे कौतुक करत आहेत.

शनिवारी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) मध्ये स्टायलिश एन्ट्री केलेल्या या जोडप्याने पार्टीतील फोटो पोस्ट केले. शेअर केलेल्या दोन्ही फोटोंमध्ये दोघेही छान हसत आहेत. सबा लाल गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे. तर हृतिक काळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना हृतिकने लिहिले की, "विथ रेड लेडी."

हृतिक रोशन फायटरमध्ये दिसणार आहे. सबा आझाद वेबसीरीज रॉकेट बॉईजमध्ये दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT