Housefull 5 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 : अक्षय कुमार ते रितेश देशमुख; नाना पाटेकर यांच्यासोबत कलाकारांनी खेळली फुगडी, पाहा VIDEO

The Phoogdi Dance : 'हाऊसफुल 5'च्या नवीन धमाकेदार गाण्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. यात नाना पाटेकर यांच्यासोबत बॉलिवूडच्या कलाकारांनी फुगडी खेळली आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'हाऊसफुल 5'ची (Housefull 5) चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात खूप तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. चित्रपटच्या ट्रेलरनं तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहेत. गाण्याची झलक पाहून चाहते दिवाने झाले आहेत. यात बॉलिवूडचे कलाकार एक वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. गाण्यात कलाकार फुगडी घालताना दिसत आहेत.

अक्षय कुमार याने 'हाऊसफुल 5'चे नवीन गाणे 'द फुगडी डान्स'ची झलक सोशल मीडियावर पोस्ट करून दाखवली आहे. या गाण्यात नाना पाटेकर यांच्या हटके डान्सची झलक पाहायला मिळाली आहे. ते सर्व कलाकारांना आपल्या गाण्याच्या तालावर नाचवताना दिसत आहेत. गाण्यामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी नाना पाटेकर यांच्यासोबत फुगडी घालताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

'हाऊसफुल 5' ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन ,जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ असे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'हाऊसफुल 5' च्या सर्वच गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांचे पात्र नेमकं काय असणार आहे, याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे. पण गाण्यातील त्यांच्या हा खास अंदाज पाहून चित्रपटात ते प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करणार असल्याचे दिसून येत आहे. नाना पाटेकर यांचा हा 'फुगडी डान्स' सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनी मराठमोळा ठेका धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT