Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5: 'हाउसफुल 5' ने रिलीजपूर्वीच पार केला १०० कोटींचा टप्पा; ओपनिंगला करणार इतक्या कोटींचा गल्ला

Housefull 5 Box Office Collection: अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'हाउसफुल 5' या बहुप्रतिक्षित चित्रपटाने रिलीजपूर्वीच 135 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Shruti Vilas Kadam

Housefull 5 Box Office Collection: अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'हाउसफुल 5' या बहुप्रतिक्षित चित्रपटाने रिलीजपूर्वीच 135 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईत सॅटेलाइट, डिजिटल स्ट्रीमिंग आणि म्युझिक राइट्सचा समावेश आहे. चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतभर 5000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे .

'हाउसफुल 5' हा आतापर्यंतचा सर्वात महागडा कॉमेडी चित्रपट मानला जातो, ज्याचा एकूण बजेट 375 कोटी रुपये आहे. यापैकी 225 कोटी रुपये केवळ प्रॉडक्शनसाठी खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे .

या चित्रपटाची खासियत म्हणजे त्याचे दोन वेगवेगळे क्लायमॅक्स. प्रत्येक थिएटरमध्ये वेगळा मर्डर मिस्ट्री प्लॉट आणि वेगळा खुनी पाहायला मिळणार आहे. या नव्या प्रयोगामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या कथानकात एक लक्झरी क्रूझवर घडणाऱ्या घटनांची मजेशीर आणि रहस्यमय मांडणी आहे .

'हाउसफुल 5' ला बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरवण्यासाठी 325 कोटी रुपयांहून अधिक कमाई करावी लागणार आहे. मात्र, रिलीजपूर्वीच मिळालेल्या 135 कोटी रुपयांच्या कमाईमुळे चित्रपटाला आर्थिकदृष्ट्या मजबूत आधार मिळाला आहे. चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनामुळे आणि नव्या प्रयोगांमुळे तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT