Housefull 5 Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5'चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम, चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर

Housefull 5 Box Office Collection Day 3: अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' चित्रपट सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. हा चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

Shreya Maskar

तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल 5' (Housefull 5) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) , रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर आणि श्रेयस तळपदे , संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार पाहायला मिळत आहेत. यांच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहेत.

'हाऊसफुल 5' 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटाने दोन दिवसांत 50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपट लवकरच 100 कोटींचा व्यवसाय करणार आहे. चित्रपटाचे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 3

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • एकूण - 87 कोटी रुपये

अक्षय कुमारने घेतला चित्रपटाचा रिव्यू

अक्षय कुमारने हटके स्टाइलमध्ये 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे लोकांकडून रिव्यू घेतले आहेत. अक्षय कुमार चेहऱ्याला किलर मास्क लावून वांद्रे येथील थिएटरबाहेर येणाऱ्या प्रेक्षकांना 'हाऊसफुल 5' चित्रपट कसा वाटला? आणि चित्रपटात कोणाची भूमिका आवडली? हे प्रश्न विचारले. प्रेक्षकांकडून "चित्रपट खूप चांगला", "चित्रपट आम्हाला खूप आवडला", "चित्रपट बेस्ट होता", "सर्वच कलाकारांनी चांगल काम केले" अशा प्रतिक्रिया येत होत्या. अक्षय कुमारने चेहऱ्याला मास्क लावल्यामुळे तेथे त्याला कोणीही ओळखू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रोह्याचे ग्राम दैवत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, घर अन् ऑफिसची ३ वेळा रेकी; सलमान खानसोबत जवळचे संबंध

Diwali Ladoo Recipe : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Shocking : संभाजीनगर हादरले! बाप लेकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

SCROLL FOR NEXT