Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच, ११व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Housefull 5 Box Office Collection Day 11: अक्षय कुमारचा फुल कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ११व्या दिवशी सिनेमाने किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि नाना पाटेकर यांचा कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने खूप कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर खूप गाजत आहे.

'हाऊसफुल 5' चित्रपटातील अक्षय कुमारच्या कॉमेडीला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'हाऊसफुल 5' नं दुसऱ्या सोमवारी किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. या चित्रपटात फुल कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे.

चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 127.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या आठवड्यात कोणती कमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'हाऊसफुल 5' लवकरच आपले बजेट देखील वसूल करणार आहे.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 11

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 7 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6 कोटी रुपये

  • नववा दिवस - 9.5 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 11 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 4.25 कोटी रुपये

  • एकूण - 158.50 कोटी रुपये

'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 5'मध्ये रितेश, अभिषेक, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकार पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

SCROLL FOR NEXT