Bigg Boss Task  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: जबरदस्त टास्क; तरुणांनी सादर केली लावणी, दिलखेचक अदांनी जिंकले मन

'चान्स-पे-डान्स' या टास्कमुळे सर्व स्पर्धकांनी आपल्या डान्सने सर्वांनाच थक्क करुन सोडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: २ ऑक्टोबरपासून सुरुवात झालेल्या 'बिग बॉस ४' रिअॅलिटी शो ची वादळी सुरुवात झाली होती. दरवाजा उघडताच काही स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले होते. चौथ्या सीझनचे स्पर्धकांना पहिले साप्ताहिक कार्य 'दे धडक- बेधडक' देण्यात आले होते. सदस्यांना देण्यात येणाऱ्या साप्ताहिक कार्यातील सदस्यांची उपकार्याची सुरुवात वादविवादाने झाली. बिग बॉसच्या आदेशानंतरही सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगताना दिसत होती. आज बिग बॉसच्या घरात नवीन टास्क देण्यात आला आहे. त्या टास्कचे नाव 'चान्स-पे-डान्स'असे आहे.

'चान्स-पे-डान्स' या टास्कमुळे सर्व स्पर्धकांनी आपल्या डान्सने सर्वांनाच थक्क करुन सोडले आहे. हा टास्क महिला स्पर्धक करणार नसून मुलं या टास्कवर लावणी सादर करणार आहेत. ही लावणी प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर नऊवारी परिधान करत सादर करणार आहेत. डान्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोत दोघांच्याही लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट केले आहेत. दोघांच्या ही दिलखेचक अदांनी प्रेक्षक मन जिंकले आहेत. शो सुरु झाल्यापासून दिवसागणिक कार्यक्रमाची रंगत वाढताना दिसत आहे. कोणता स्पर्धक प्रेक्षकांची सर्वाधिक मने जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT