Yai Re Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh: सलमानच्या एक्सचा हनी सिंहसोबत भन्नाट डान्स, हूक स्टेप्सने गाण्याला दिला जबरदस्त तडका...

हनी आणि युलिया दोघेही 'याई रे'च्या हुक-स्टेपवर नाचताना दिसत आहेत.

Pooja Dange

Honey Singh New Song: रॅपर यो यो हनी सिंहने 1990 च्या दशकातील हिट चित्रपट 'रंगीला' मधील सुपरहिट ट्रॅक 'याई रे' रिक्रिएट केला आहे. हे गाणे ग्रॅमी आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांचे पहिले हिंदी साउंडट्रॅक होते.

या गाण्यात युलिया वंतूरला एका नव्या अवतारात दिसत आहे. हे गाणे प्रदर्शित होताच सुपरहिट झाले आहे. काही तासांतच या गाण्याला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर युलियाने जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणे तुम्हाला नाचायला भाग पाडेल.

या गाण्याविषयी बोलताना हनी सिंह म्हणाला, "मला 'याई रे' हे मूळ गाणे खूप आवडले आणि जेव्हा असा आयकॉनिक ट्रॅक पुन्हा तयार करण्याची संधी मिळाली, तेव्हा मला ते करताना खूप आनंद झाला! 'याई रे' हे 2022-2023 चे पार्टी अॅंथम आहे. आम्हाला अपेक्षा आहे की मूळ गाण्याप्रमाणेच चाहत्यांना हे गाणे सुद्धा आवडेल.

'याई रे' म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन मिहिर गुलाटी यांनी केले आहे. मिहीरने हनी सिंहसोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. हा व्हिडिओ एका क्लबमध्ये सेट करण्यात आला आहे, जिथे हनी आणि युलिया दोघेही 'याई रे'च्या हुक-स्टेपवर नाचताना दिसत आहेत. या गाण्याला यूट्यूबवर 10 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Song)

युलिया वंतूर या गाण्यावर प्रतिक्रिया देत म्हणाली, जेव्हा मी हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मी स्वतःला नाचण्यापासून रोखू शकले नाही. या गाण्याच्या व्हाईब एक नवीन ऊर्जा निर्माण करतात आणि तुम्हाला आनंदी वाटते. ए.आर. रहमान आणि आशा भोसले यांचा हा मूळ ट्रॅक आहे. हनी सिंहने आपल्या स्टाइलने या गाण्याला मसालेदार बनवण्याचे काम केले आहे. (Celebrity)

"यो यो हनी सिंग आणि टिप्सने मला या अप्रतिम गाण्याचा एक भाग बनवण्याचा विचार केला याबद्दल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. या म्युझिक व्हिडीओसाठी गायन आणि शूटिंग करताना खूप मजा आली. मला अपेक्षा आहे की चाहत्यांना हे गाणे आमच्या इतकेच आवडेल. येणारे नवीन वर्ष आम्हा सर्वांसाठी आनंदी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kishore Kadam : किशोर कदम यांचे गाजलेले सिनेमे आणि अविस्मरणीय भूमिका

गावाहून परतली अन् वसतीगृहात गळ्याला दोर लावला; आयुष्य संपवण्यापूर्वी वडिलांना फोन, कोल्हापूर हादरलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...

Jolly LLB 3: कोर्टात दोन जॉली देणार कॉमेडीचा ट्रिपल डोस; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी येणार आमने-सामने

SCROLL FOR NEXT