Honey Singh Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh Case: हनी सिंगला कॉन्सर्टमध्ये घडलेल्या 'त्या' प्रकारावरुन मिळाली वॉर्निंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Honey Singh Case: हनी सिंगच्या मुंबईतील MMRDA मैदानावर झालेल्या कॉन्सर्टनंतर गायकाला वार्निंग देण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई केली आहे.

Shruti Vilas Kadam

Honey Singh Case: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगने कमबॅक केल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. त्याचे चाहते त्याच्या कमबॅकमुळे खूप खूश आहेत. चाहत्यांच्या प्रेमासाठी हनी सिंगने ‘माय स्टोरी- इंडियन चॅप्टर’ या दौऱ्याचे आयेजन केले आहे. पण या दौऱ्यातील मुंबईच्या कॉन्सर्टमुळे हनी सिंग कायद्याच्या कचाकड्यात अडकला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.

‘माय स्टोरी- इंडियन चॅप्टर’ या दौऱ्यात हनी सिंग अनेक कॉन्सर्ट करणार आहे. २८ मार्च २०२६ रोजी एमएमआरडीए मैदान येथील कॉन्सर्टमध्ये पोलिसांनी आधीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, विमानतळ परिसराच्या जवळ असल्यामुळे लेझर लाइट्सचा वापर करू नये. मात्र, आयोजकांनी या निर्देशांकडे दुर्लक्ष करत कार्यक्रमादरम्यान लेझर लाइट्सचा वापर केल्याचा आरोप आहे.

या नियमभंगामुळे विमानतळ सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी 'तमन्नाझ वर्ल्डवाईड' या संस्थेचे प्रतिनिधी इंद्रजित सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि हवाई क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी सुमारे १२,००० प्रेक्षक उपस्थित राहतील असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात १८,००० ते २०,००० लोकांनी हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय, लेझर लाइट्समुळे विमानतळ परिसरातील सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण झाला होता.

दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवरही हनी सिंगच्या परफॉर्मन्सला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.‘डोप शॉप’, ‘ब्लू आईज’, ‘ब्राऊन रंग’, ‘मिलियनेअर’, ‘देसी कलाकार’ आणि ‘लुंगी डान्स’ यांसारख्या गाण्यांवर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हनी सिंगचा ‘My Story – India Chapter’ दौरा पुढेही सुरू राहणार असून, ४ एप्रिल रोजी पुणे, ११ एप्रिलला कोटा, २५ एप्रिलला इंदूर, २ मे रोजी लखनौ आणि ९ मे रोजी कोलकाता येथे कार्यक्रम होणार आहेत. १६ मे रोजी बंगळुरू येथे या दौऱ्याची सांगता होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

SCROLL FOR NEXT