मराठमोळ्या अभिनेत्याने पहिल्यांदा दाखवली आपल्या मुलांची झलक
अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा
अभिनेत्याने आपल्या मुलांसाठी लिहिला खास मेसेज
'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका खूप गाजली. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. याच मालिकेत जान्हवीच्या भावाची म्हणजेच 'पिंट्या'ची भूमिका साकारणारा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनंतर बाबा झाला आहे. मराठमोळा अभिनेता रोहन गुजरने पहिल्यांदाच आपल्या बाळाचा फोटो शेअर करून एक खास कॅप्शन त्याला दिले आहे.
रोहन गुजरच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. स्नेहलने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली आहे. रोहन-स्नेहल आई-बाबा झाले. या क्यूट कपलने फेब्रुवारी २०२५ मध्ये आपण आई-बाबा होणार याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये त्यांनी बाळांची पहिली झलक दाखवली, ज्यात दोन्ही बाळांचे सुंदर हात दिसत आहे आणि आता १९ ऑक्टोबरला अभिनेत्याने दोन्ही मुलांचे चेहरे दाखवले आहेत. जुळ्या मुलांची गोड झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन फोटो दिसत आहे. पहिल्या फोटोत दोन्ही मुलं खिडकीजवळ बसून बाहेर पाहताना (जग) दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांचा चेहरा दिसत आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारमंडळी भरभरून कमेंट्स करत आहेत. पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
"अभ्यासाचं जरा मला ठाऊक नाही
पण मी नेटाने तुम्हाला निसर्ग शिकवेन
बहरणं गळणं थांबणं शिकवेन
बघणं ऐकणं समजून घेणं शिकवेन
रंगांची भावना
भावनांचे कोन
चवीचा स्पर्श
स्पर्शाच गणित
आकार उकार हुंकार शिकवेन
माणसांची अथांग कोडी घालेन
उत्तराचा अद्भुत प्रश्न शिकवेन
पाणी आकाशातलं डोळ्यातलं शिकवेन
माणूस रंगापलीकडला भाषेपलीकडला शिकवेन
मी तुम्हाला प्रयत्न शिकवेन
पहिल्या क्रमांकाचं हरणं शिकवेन आणि
शेवटचा आनंद ही शिकवेन..."
अभिनेता रोहन गुजर आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये दिसला आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलं केले आहे. त्याच्या 'लव्ह लग्न लोचा', 'साथ दे तू मला', 'सांग तू आहेस का', 'बन मस्का' आणि 'नवी जन्मेन मी' मालिका खूप गाजल्या. तो 'मोरया' या मराठी चित्रपटातही दिसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.