Game Of Thrones Fame Darren Kent Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Darren Kent Dies: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ३९ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

Game Of Thrones Fame Darren Kent Death: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वेबसीरीजमधील प्रसिद्ध अभिनेता डॅरेन केंटचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले.

Chetan Bodke

Game Of Thrones Fame Darren Kent Passes Away: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या चाहत्यांकरीता एक दु:खद बातमी आहे. या हॉलिवूड वेबसीरीजमधील प्रसिद्ध अभिनेता डॅरेन केंटचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, डॅरेन केंट यांची ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्राणज्योत मालवली आहे.

टॅलेंट एजन्सी कॅरी डॉड असोसिएट्सने मंगळवारी ट्वीटरवरून एका निवेदनाच्या माध्यमातून अभिनेत्याच्या निधनाची बातमी दिली आहे. “आम्हाला बातमी सांगताना अत्यंत दुःख होत आहे, आमचे प्रिय मित्र आणि क्लायंट डॅरेन केंट यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. त्याचे आईवडील आणि जिवलग मित्र त्याच्या पाठीशी होते. या कठीण काळात आमचे विचार आणि प्रेम त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली.” हे भावनिक निवेदन डॅरेनच्या एजन्सीने प्रसिद्ध केले.

अभिनेता डॅरेन केंटविषयी सांगायचे तर, त्याचा जन्म एसेक्समध्ये झाला. त्याने इटालिया कॉन्टी येथे २००७ मध्ये महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्याने २००८ मधील एका हॉरर चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. नंतर त्याने एमी-विजेत्या गेम ऑफ थ्रोन्समध्ये काम केले. गेम ऑफ थ्रोन्समध्ये केंटने स्लेव्हर्स बे मधील गोथर्डची भूमिका साकारली होती. (Hollywood)

2023 मध्ये Dungeons and Dragons: Honor Among Thieves या चित्रपटातील त्याची भूमिका बरीच चर्चेत आली होती. केंटने त्याच्या सिनेकारकिर्दित स्नो व्हाइट अँड द हंट्समन, मार्शल लॉ, ब्लडी कट्स, द फ्रँकेन्स्टाईन क्रॉनिकल्स, ब्लड ड्राइव्ह आणि बर्ड्स सॉरो अशा अनेक चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT