Hagrid And Harry potter Saam Tv
मनोरंजन बातम्या

Harry Potter: हॅग्रीडने घेतला जगाचा निरोप, अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन

भारदस्त शरीर आणि हळवा स्वभाव असलेल्या हॅग्रीडच्या जाण्याने चाहते झाले भावुक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: हॅरी पॉटर (Harry Potter) या व्यक्तिरेखेसह त्या चित्रपटांची प्रत्येक सीरीज प्रसिद्ध आहे. अमेरिकेसह जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. हॅरी पॉटर अनेकांच्या बालपणातील एक सुखद भाग आहे. त्यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यातील एक पात्र ज्याने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. ते पात्र म्हणजे 'रुबियस हॅग्रीड'. हे पात्र साकारणारे अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रॉबी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. (News)

हॅरी पॉटरमधील रॉबी कोल्ट्रेन यांनी साकारलेले हॅग्रीड हे पात्र प्रेक्षकांना खूप भावले होते. भारदस्त शरीरयष्टी असलेला हॅग्रीड मनाने तितकाच हळवा होता. हॅग्रीडच्या विनोदी आणि मिस्कील स्वभावाने सर्वांचे लक्ष वेधले होते. रॉबी यांचे हॅरी पॉटरमधील पात्र जरी लोकप्रिय झाले असले तरी त्याने इतर अनेक भूमिका साकारल्या आहेत. जेम्स 'बॉन्ड २' चित्रपटातील (Movie) 'गोल्डन आय' आणि 'द वर्ल्ड इज न इनफ' या दोन्ही चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

रॉबी यांची एजेंट बेलिंडा राईट यांनी ही बातमी (News) दिली आहे. त्याचबरोबर बेलिंडा यांनी हॅग्रीड यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या कठीण प्रसंगी रॉबी यांच्या कुटुंबियांना प्रेक्षकांनी खासगी वेळेत त्रास देऊ नये अशी विनंती केली आहे. यांच्या निधनामुळे हॉलिवूडमधील कलाकारांनी आणि तिथल्या राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केला आहे.

रॉबी यांनी त्यांच्या चित्रपटही योगदानाबद्दल २०११ मध्ये 'बाफता स्कॉटलंड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. रॉबी यांनी १९७९ साली त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारगीर्दीला सुरुवात केली. रॉबी यांचे हॅग्रीड हे पात्र लोकांच्या कायम लक्षात राहील. रॉबी कोल्ट्रेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT