Hollywood Actor Tom Wilkinson Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tom Wilkinson Death: 2023 च्या शेवटी हॉलिवूडला मोठा धक्का, 'द फुल मॉन्टी' फेम Tom Wilkinson यांचं निधन

Hollywood Actor Tom Wilkinson: टॉम विल्किन्सन यांच्या निधनामुळे (Tom Wilkinson Passes Away) हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Priya More

Tom Wilkinson Passes Away:

हॉलिवूडमधून (Hollywood) एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि ऑस्कर पुरस्कारासाठी दोनदा नामांकन मिळालेले ब्रिटिश वंशाचे अभिनेते टॉम विल्किन्सन (Tom Wilkinson) यांचे निधन झाले. विल्किन्सन यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी अभिनेत्याचे राहत्या घरी निधन झाले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलं त्यांच्यासोबत होते. टॉम विल्किन्सन यांच्या निधनामुळे (Tom Wilkinson Passes Away) हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

टॉम विल्किन्सन यांच्या कुटुंबीयांनीच त्यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. टॉम विल्किन्सनला 'मायकेल क्लेटन' आणि 'इन द बेडरुम' या सस्पेन्स चित्रपटांमधील त्याच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी खूप चांगली पसंती मिळाली. या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहेत. त्यांनी 50 वर्षांच्या कारकिर्दीत 130 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॉम विल्किन्सन यांनी दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी 'बाफ्टा', 'एमी' आणि 'गोल्डन ग्लोब' यासारखे पुरस्कारही जिंकले आहेत. कॉमेडी, ड्रामा आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. टॉम विल्किन्सन यांनी अनेक चित्रपटांमध्ये अमेरिकन राजकीय व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत. ते याच भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध होते.

द केनेडीजमधील राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या वडिलांच्या भूमिकेसाठी टॉमला एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते आणि जॉन अॅडम्स या छोट्या मालिकेतील बेंजामिन फ्रँकलिनच्या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्याच्या अप्रतिम अभिनय कौशल्यासाठी टॉमला यूके स्मॅश कॉमेडी आणि म्युजिकल द फुल मॉन्टी मधील त्याच्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

26 वर्षांनंतर ते या वर्षाच्या सुरुवातीला डिस्ने शोमध्ये एका भूमिकेत दिसले होते. टॉम विल्किन्सन यांच्या निधनामुळे फक्त हॉलिवूडमध्येच नाही तर जगभरातील चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. जगभरातील चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार; विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT