Jefferson Machado Death
Jefferson Machado Death Saam TV
मनोरंजन बातम्या

Jefferson Machado Death: ब्राजीलियन अभिनेता जेफरसन मचाडोचे निधन, 4 महिन्यांपासून होता बेपत्ता

Pooja Dange

Hollywood Actor Jefferson Machado Died: सिनेसृष्टीतील मृत्यूची मालिका सुरूच आहे. आदित्य सिंग राजपूतच्या निधनाने ही मालिका सुरू झाली त्यानंतर सिनेसृष्टीने एकापाठोपाठ एक अनेक स्टार्स गमावले आहेत. या स्टार्समध्ये केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारच नाहीत तर हॉलिवूडमधील कलाकारांचाही समावेश आहे.

पॉप गायिका टीना टर्नरच्या मृत्यूतून हॉलिवूड अद्याप सावरलेले नाही, त्यात आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा अभिनेता जेफरसन मचाडो घराबाहेर लाकडी पेटीत मृतावस्थेत आढळला आहे. या बातमीने सर्वांनाच हादरवले आहे.

एका रिपोर्टनुसार, ब्राझीलचा अभिनेता जेफरसन मचाडो अनेक महिन्यांपासून बेपत्ता होता. जवळपास चार महिन्यांपासून बेपत्ता असलेला हा अभिनेता रिओ दि जानेरो येथील घराबाहेर लाकडी पेटीत मृतावस्थेत आढळून आला. त्याची फॅमिली फ्रेंड सिंथिया हिलसेंडेगर हिने अभिनेत्याच्या इंस्टाग्राम पेजवर त्याच्या मृत्यूची पुष्टी करणारा संदेश पोस्ट केला.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की जेफ 22 मे 2023 रोजी मृत सापडला होता.' अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय अभिनेत्याचा मृतदेह लाकडी पेटीत साखळदंडाने बांधलेला आढळून आला. हा बॉक्स काँक्रीटने झाकून घराच्या मागील बाजूस सहा फूट गाडला होता.

"त्याचे हात डोक्याच्या मागे बांधले गेले होते आणि एका ट्रंकमध्ये घालून पुरले होते. ती ट्रंक त्याच्या घरात ठेवलेल्या बॉक्ससारखी होतो," जेफरसन मचाडोच्या कुटुंबाचे वकील जैरो मगलहास यांनी सांगितले. फिंगरप्रिंट्स वापरून मृतदेहाची ओळख पटली आणि मानेवर एक रेष होती, ज्यावरून त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समजते.

कुटुंबाने इंस्टाग्रामवर लिहिले, 'जेफरसनची ईर्ष्यावान, दुष्ट आणि नक्कीच बेईमान लोकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. अधिक माहिती लवकरच कळेल, आरजे टाऊनशिप पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक छोट्या तपशीलात मदत करणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार.

वृत्तानुसार, पोलिस सध्या घर भाड्याने दिलेल्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. आरोपी महिनाभरापूर्वी घरात प्रवेश करताना दिसले होते. आरोपी अभिनेत्याला ओळखत होते. जेव्हा एका स्वयंसेवी संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा अभिनेत्याच्या कुटुंबाला त्याच्या अपहरणाची माहिती मिळाली.

काही महिने अभिनेत्याच्या घरच्यांना टेक्स्ट मेसेज येत होते. ती व्यक्ती जेफरसनसारखी वागत होती. जेफर्सच्या आईला संशय आला होता कारण त्यांना येत असलेल्या मेलमध्ये बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक होत्या. तसेच ते मेल त्यांचा मुलगा म्हणजे जेफरसन जसे लिहायचा तसे नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Lok Sabha: मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा

Breakfast Recipe: ज्वारीच्या पीठापासून बनवा झटपट पौष्टीक नाश्ता

Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक' चित्रपटातला कॅप्टन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद राहणार

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT