Khalid Ka Shivaji  
मनोरंजन बातम्या

Khalid Ka Shivaji Controversy : पुण्यात 'खालिद का शिवाजी' वादाच्या भोवऱ्यात, हिंदू महासंघ आक्रमक, वाचा नेमकं कारण काय?

Khalid Ka Shivaji Movie : 'खालिद का शिवाजी' या मराठी चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू महासंघाची मागणी आहे. शिवाजी महाराजांचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत सेन्सॉर बोर्डाकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • 'खालिद का शिवाजी' चित्रपटात शिवाजी महाराजांच्या विकृतीकरणाचा आरोप

  • हिंदू महासंघाने सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्याला बंदी घालण्याचे पत्र पाठवले

  • चित्रपट ८ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडलेला

  • बंदी न घातल्यास महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा हिंदू महासंघाचा इशारा

अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सर्वदूर पसरली आहे. महाराजांचा इतिहास घरोघरी पोहचवण्यासाठी अनेक इतिहास प्रेमी आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक पुढे येत आहेत. अशातच आता 'खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या वादाला सामोरे जात आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही वादग्रस्त मांडणी असल्याचा आरोप करत हिंदू महासंघाने चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासाठी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट निर्मात्याला पत्र पाठवले असून, जर बंदी घातली नाही, तर ज्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होईल तिथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून, विशेष म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी या चित्रपटाची निवड झाल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याआधीच हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रोश सुरु झाला आहे. हिंदू महासंघाचे अनंद दवे यांनी आरोप केला आहे की, या चित्रपटात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडला गेला असून, त्यांचे विकृतीकरण करण्यात आले आहे.

दवे यांच्या मते, चित्रपटात शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्षतेच्या अनुषंगाने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जो इतिहासाच्या सत्यतेशी फारकत घेणारा आहे. “शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे स्थापक होते, त्यांचे खरे दर्शन जनतेला व्हायला हवे. पण या चित्रपटात त्यांच्या विचारांची दिशाभूल करणारी भूमिका दिसते,” असे दवे यांनी सांगितले.

आनंद दवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा केवळ चित्रपट नसून आमच्या श्रद्धेवर आघात आहे. जर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, तर आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही थिएटरमध्ये चित्रपट लावला गेला, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.” दरम्यान, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, वाद वाढत असल्याने प्रशासन आणि सेन्सॉर बोर्डाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागणार आहे. चित्रपटावर बंदी येते की तो नियोजित वेळेत प्रदर्शित होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'खालिद का शिवाजी' चित्रपटावर वाद का सुरु झाला आहे?

हिंदू महासंघाचा आरोप आहे की चित्रपटात शिवाजी महाराजांचे विकृतीकरण केले आहे व त्यांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या चित्रपटावर कोणत्या संघटनेने बंदीची मागणी केली आहे?

हिंदू महासंघाने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली असून सेन्सॉर बोर्डाला पत्रही पाठवले आहे.

चित्रपटाची विशेष बाब काय आहे?

हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला गेला आहे आणि ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

जर चित्रपटावर बंदी घातली नाही, तर काय होईल?

हिंदू महासंघाने इशारा दिला आहे की चित्रपट जिथे प्रदर्शित होईल, तिथे तीव्र आंदोलन केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishnavi Kalyankar: 'देवमाणूस'च्या खऱ्या बायकोचा नऊवारीतील मनमोहक लूक पाहिलातं का?

Maharashtra Politics: तयारीला लागा! उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पण मनसेसोबतच्या युतीबाबत सस्पेन्स

Raksha Bandhan 2025: बायकोने नवऱ्याला राखी बांधावी की नाही?

भाजपात बंपर इनकमिंग! काँग्रेस अन् शिवसेनेला खिंडार; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते भाजपवासी

कबुतरांना दाणे टाकण्यास विरोध केल्याने राडा; वृद्धासहित मुलीवर रॉडने हल्ला,VIDEO

SCROLL FOR NEXT