Hina Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hina Khan : कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा नवा VIDEO आला समोर; नेटकरी म्हणाले, लवकर बरी होशील!

Hina Khan Dance Video : हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. अशात तिने आता सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तू खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी (Breast Cancer) लढा देत आहे. तिने सोशल मीडियावरून ही बातमी दिली होती. तेव्हापासून आजवर ती आपला हेल्थ अपडेट नेहमी देत असते. हिनाला स्टेज 3चा ब्रेस्ट कॅन्सर आहे. तरी अभिनेत्री खूप ॲक्टिव पाहायला मिळते. सध्या अभिनेत्री केमोथेरपीचा उपचार घेताना दिसत आहे.

हिना खान (Hina Khan) सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते. नुकतीच हिना एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर टाकला आहे. हिना खानने सोनू ठुकरालच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'सैया की बंदूक' या गाण्यावर डान्स करतानाची एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडिओतील अभिनेत्रीचा बॉसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या प्रवासाला ती खूप धाडसाने सामोरे जात आहे. म्हणून तिचे कौतुक केले जाते.

हिना खानच्या या डान्स व्हिडिओमध्ये ती ब्लॅक टॉप, हिरवा स्कर्ट, काळा सनग्लासेस आणि हील्स परिधान भन्नाट डान्स करत आहे. या व्हिडिओतील तिची एनर्जी लेव्हल उल्लेखनीय आहे. या व्हिडिओला हिना खानने भन्नाट कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, 'माझ्या प्रिय सोनू ठुकरालसाठी, प्रत्येकजण पटकन एक छान रील बनवा.' आजारपणातही हिना कलेला दाद देत आहे. या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून कौतुक होत आहे. चाहत्यांनी या डान्स व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. यात एका चाहत्यांनी लिहिलं आहे की,'लवकर बरे व्हा!' तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, तुम्हाला अस पाहून आनंद झाला, तुम्ही खूप स्ट्राँग आहात' चाहते नेहमीच हिनाला या प्रवासात पाठिंबा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकर्त्याला साथ का दिली? जाब विचारत अजित पवारांचा नेता घरात घुसला, दगड- कोयत्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Highest Grossing Movies : 2025मध्ये 'छावा' चा बोलबाला, सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू

Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Migraine Solution : मायग्रेनने त्रस्त आहात? या जपानी ट्रिकने मिळेल आराम

SCROLL FOR NEXT